scorecardresearch

आमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन

‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खानने नव्या जोमाने पुढील चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे.

आमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन

गेले काही दिवस आमिर खान चांगलाच चर्चेत आहे. बॉयकॉट ट्रेंडचा फटका बसल्याने त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट चांगलाच अपयशी ठरला. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट अयशस्वी ठरला असला तरी आमिर खानने नव्या जोमाने पुढील चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्याचा हा आगामी चित्रपटही एका चित्रपटाचा रिमेक असणार आहे.

आणखी वाचा : प्रियांका पाठोपाठ कतरिना कैफही आत्मचरित्र लिहिण्याच्या तयारीत, ‘या’ व्यक्तींबद्दल करणार मोठे खुलासे

आमिर खानचा पुढील चित्रपट ‘कॅम्पियन्स’ या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असेल. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना करणार आहे. चित्रपटात अनुष्का शर्माचीही प्रमुख भूमिका असेल असे बोलले जात आहे. यापूर्वी अनुष्का शर्मा आणि आमिर खान यांची जोडी ‘पीके’मध्ये दिसली होती.

निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू केले आहे. या चित्रपटासाठी सहा महिन्यांचे शेड्युल असणार असल्याचे बोलले जात आहे. सोनी पिक्चर्स इंडिया या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. सध्या तो अमेरिकेत सुट्टीवर असल्याने पुढील वर्षी जानेवारीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या शूटिंग्साठी आमिर खानने जानेवारीनंतरच्या डेट्स दिल्या आहेत, असे बोलले जाते. अमेरिकेतून परतल्यानंतरच आमिर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.

हेही वाचा : “मला एकदा आमिरच्या घरामध्ये…” आमिरचा भाऊ फैजल खानने केला गौप्यस्फोट

या चित्रपटाच्या संगीताची धुरा शंकर – एहसान – लॉय सांभाळणार असल्याचे समोर आले आहे. ‘कॅम्पियन्स’ चित्रपटाचा हा हिंदी रिमेकमध्ये पंजाबमधील एका हट्टी आणि तापट बास्केटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. अनेक शरीरिक समस्या असणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक टीमला तो प्रशिक्षण देताना दिसेल. आर. एस. प्रसन्ना यांनी चित्रपटाची कथा निश्चित केली असून दिव्यांग खेळाडूंना येणाऱ्या अडचणी या चित्रपटात मांडल्या जाणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 14:37 IST

संबंधित बातम्या