बॉलीवूड अभिनेता आमिर खानने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण मागील काही वर्षांमध्ये त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. एका मोठ्या ब्रेकनंतर आमिर लवकरच परत येतोय. ‘तारे जमीन पर’ या त्याच्या गाजलेल्या चित्रपटाचा पुढील भाग म्हणजेच ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आमिर खान आणि जिनिलिया देशमुख दिसणार आहेत.

आमिर खान शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता. आता आमिरचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. अभिनेत्यानं त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २० जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्यानंतर तो थेट युट्यूबवर ‘पे-पर-व्ह्यू’ स्वरूपात प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र तो ओटीटीवर येणार नाही.

दोन महिन्यांनंतर युट्यूबवर पाहता येईल सिनेमा

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दोन महिन्यांनी युट्यूबवर वर ‘पे पर व्ह्यू’वर उपलब्ध होईल. आमिर खानने सुरुवातीला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सहा महिन्यांनी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्याचा प्लॅन केला होता. पण नेटफ्लिक्सने हा चित्रपट दोन महिन्यांनंतरच प्रदर्शित केला. आता ‘सितारे जमीन पर’ आमिरने ओटीटीवर रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सितारे जमीन पर’ या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या पोस्टरमधून आमिर खान बास्केटबॉलच्या शिक्षकाच्या भूमिकेत असणार असल्याचे दिसत आहे. पोस्टरमध्ये आमिर खानबरोबरच आरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे कलाकारदेखील दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सितारे जमीन पर’ हा ‘तारे जमीन पर’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केलं आहे. आमिर खान प्रॉडक्शन, रवी भागचंदका यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. आमिरने या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. या चित्रपटाला रिलीजनंतर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, ते लवकरच कळेल.