Lauren Gottlieb Wedding : तुम्ही रेमो डिसूझाचा ‘एबीसीडी’ हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री लॉरेन गॉटलीब तुम्हाला आठवत असेल. या अभिनेत्रीने इटलीमध्ये लग्न केले आहे.
तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लॉरेन गॉटलीबने ११ जून रोजी इटलीच्या टस्कनी येथे एका खासगी समारंभात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यापूर्वी तिने गेल्या वर्षी २०२४ मध्ये कॅरेबियनमध्ये तिच्या साखरपुड्याची घोषणा केली होती.
लग्नाच्या दिवशी प्रत्येक अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे वेगळा असतो. हे पाहिल्यानंतर चाहते त्यांचे कौतुक करतात. आता ‘एबीसीडी’फेम अभिनेत्री लॉरेन गॉटलीबनेदेखील गाऊनमध्ये वधू बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ती एक अमेरिकन अभिनेत्री व नृत्यांगना आहे. पण भारतात काम केल्यामुळे भारतीय चाहतेदेखील तिला खूप पसंत करतात. ३७ वर्षीय या सौंदर्यवतीने लंडनमध्ये राहणाऱ्या व्हिडीओ क्रिएटर टोबियास जोन्सशी लग्न केले आहे. लग्नाचे फोटो स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडत आहेत.
लॉरेनच्या लग्नाच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर तिने असा गाऊन निवडला आहे, जो इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याबरोबरच दागिन्यांची तिची निवडही परिपूर्ण होती, ज्यामुळे तिचा लूक खूप सुंदर दिसत होता. दोघांनीही ११ जून रोजी लग्न केले. पण आज फोटो शेअर करण्यात आले आहेत, जे काही मिनिटांत सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.
लॉरेनने तिच्या व्हाईट वेडिंगसाठी ओव्हरी गाऊन निवडला आहे, ज्यामध्ये ती सर्वांत सुंदर दिसते. तिच्या आऊटफिटवर बारीक डिटेलिंग करण्यात आले आहे. तसेच, स्लीव्हलेस स्टाईलनेदेखील तिचा लूक खास स्टायलिश बनवला. लॉरेनचा लग्नाचा गाऊन ऑफ-शोल्डर होता. तिचा पती टोबियासदेखील कमी दिसत नव्हता. तो काळ्या आऊटफिटमध्ये खूप डॅशिंग दिसत होता.
मागील वर्षीच साखरपुडा
लॉरेन गॉटलीब आणि टोबियास जोन्स यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये हे जोडपे एकमेकांबरोबर रोमँटिक पोज देताना दिसत आहे. लॉरेनने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये टोबियास जोन्सशी साखरपुडा केला होता.