बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. परंतु जेव्हा कधी तो सोशल मीडियावर येतो तेव्हा तो सर्वांचेच लक्ष वधून घेतो. यावेळीही त्याने असाच एक लक्षवेधी व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमार्फत अभिनेषकने आपल्या बालपणीच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला आहे.
सर्वाधिक वाचकपसंती – “कशाला मदत करणार? मृतदेह उचलायला?”: मोदींच्या त्या ट्विटवर दिग्दर्शकाचा संताप
हा व्हिडीओ १९८१ सालचा आहे. त्यावेळी अभिषेक केवळ पाच वर्षांचा होता. तब्बल ३९ वर्षांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी यांच्या एका लाईव्ह स्टेज शोमध्ये बिग बींनी पहिल्यांदाच अभिषेक आणि त्याची बहिण श्वेता यांची ओळख आपल्या चाहत्यांना करुन दिली होती. त्यावेळची आठवण अभिषेकने या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सर्वाधिक वाचकपसंती – “…म्हणून मोदींनी देशाला ७० वर्षे मागे नेलं”; अभिनेत्याचा टोला
सोशल मीडियावर सध्या थ्रोबॅक फोटो आणि व्हिडीओजचा ट्रेंड सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अभिषेकने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बींचा थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला म्हणून काही जणांनी अभिषेकचे आभार देखील मानले आहेत.