बॉलिवूड अभिनेता आर्य बब्बर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरतरं आर्यला विनोद करणे महागात पडले आहे. आर्यचा हा व्हिडीओ फ्लाइटमधला आहे. या व्हिडीओत आर्य आणि पायलटमध्ये वाद होत असल्याचे दिसते. तर व्हिडिओमध्ये पायलटने आर्यवर आरोपही केले आहेत. या प्रकरणी आता आर्यने स्पष्टीकरण दिले असून संपूर्ण घटना सांगितली आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला आर्य सर्व चाहत्यांना हाय-हॅलो म्हणतो. तो फ्लाइटमध्ये असल्याचे दाखवतो. एअर होस्टेसशी ओळख करून देतो पण त्यावर ती चेहरा लपवत म्हणते की ‘चेहरा दाखवू शकत नाही.’ पुढे तो कॉकपिटमध्ये जातो आणि पायलटला विचारतो, ‘सर बोला.’ यावर तो पायलट बोलतो तुम्ही ‘तुम्ही आमच्यावर विनोद केला आहे का?’ आर्यने यावर ‘नाही’ असे उत्तर दिले. त्याने त्याच्या मित्रासोबत बसून एक विनोद केला होता असे आर्यने सांगितले. मग पायलट बोलतो की ‘ये क्या चलाएगा?’ असे म्हणत असल्याचे मी ऐकले होते. या आरोपावर आर्य म्हणतो मी म्हणालो की, ‘भाई, ये अभी आए हैं?’ त्यानंतर त्यांच्यात वाद होतो.

आणखी वाचा : “परत असं घोड्यावर बसायचं नाही”, अमोल कोल्हेंना मिळाली तंबी

आणखी वाचा : “मुलाखती देऊनही आम्हाला… ”,‘गंगुबाई’मधील दृश्यांवरुन कामाठीपुरामधील स्थानिकांची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्य हा राज बब्बर यांचा मुलगा आहे. आर्य हा मंगळुरुला जात होता. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत आर्यने ही संपूर्ण गोष्ट सांगितली आहे. यावेळी आर्य म्हणाला, ‘पायलटने काही चुकीचे ऐकले असेल, पण मी तसं काही म्हणालो नव्हतो. मी फक्त माझ्या मित्राकडे बघितले आणि म्हणालो कि भाई ये भी यहां हैं, ते पण आपल्या सोबत येत आहेत असा विनोद होता. खरंतर मी त्यांच्या एरियात गेलो होतो. तिथे मी त्याच्याशी असं बोलत होता. कदाचित पायलटने चुकीचे ऐकले असेल.’