गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र गुरुवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला. यानंतर सर्वच स्तरातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अभिनेता आरोह वेलणकरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता आरोह वेलणकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. अनेकदा तो भाजपला पाठिंबा देताना दिसतो. आरोहने महाविकासआघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर विविध मुद्द्यावरुन टीका केली आहे. तो त्याच्या ट्विटरवरुन सतत राज्यातील राजकीय घडामोडींवर ट्वीट करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने ‘महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय’ असे ट्वीट केले होते. त्यानतंर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्याने ट्विट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

“महाविकासआघाडीची वेळ संपत आलीय…”, अभिनेता आरोह वेलणकरणचे ‘ते’ ट्विट चर्चेत

‘महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य यशाचे शिखर गाठो. त्यासोबतच गेल्या अडीच वर्षात राज्याचे जे नुकसान झाले आहे ते भरुन काढण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असेच पुढे जात राहा, असे ट्विट आरोह वेलणकरने केले आहे. त्याच्या या ट्वीटनंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काहींनी यावरुन त्याला ट्रोलही केले आहे.

एकनाथ शिंदेंच्या ट्विटला रिट्वीट करत प्रसिद्ध अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “परत जाऊ नका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याचं अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली. आरोहने ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्येही काम केले आहे. त्यात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट, रंगभूमी यासोबतच त्याने बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. त्यासोबत काही दिवसांपूर्वी आरोह हा लाडाची लेक गं या मालिकेतही झळकला होता.