प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम ३’ ही वेबसीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. यात अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा पाखंडी ‘बाबा निराला’च्या भूमिकेत दिसत आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. तिसऱ्या भागात बरेच बोल्ड आणि इंटिमेट सीन आहेत. विशेष म्हणजे या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. त्यातील ईशा गुप्ता आणि बॉबी देओल यांच्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. नुकतंच बॉबी देओलने ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीनबद्दल भाष्य केले आहे.

आश्रम ३ या वेबसीरिजमध्ये बॉबी देओल, ईशा गुप्ता, त्रिधा चौधरी, अदिती पोहणकर यांसह सर्वांच्या अभिनयाचे कौतुक केले गेले. नुकतंच या पार्श्वभूमीवर बॉबी देओलने स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, “इंटीमेट सीनच्या शूटिंगदरम्यान तो पहिल्यांदा खूप नर्व्हस झाला होता. पण ईशा गुप्ताने माझ्यासाठी सर्वकाही सोपे केले. मी इंटिमेट सीन करण्याचा संपूर्ण श्रेय तिलाच देईन. मला आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा एक इंटिमेट सीन केला तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी पहिल्यांदाच असं काही करत होतो. पण ईशा ही फार प्रोफेशनल होती. तिला तिची व्यक्तिरेखा कशी साकारायची याची माहिती होती. त्यामुळे मला फार सोपं गेलं आणि लोकांनीही त्याचा आनंद लुटला.”

“मी पडद्यावर निगेटिव्ह रोल करण्यासाठी प्रचंड घाबरायचो. पण लोकांनी माझ्या भूमिकेला इतका सकारात्मक प्रतिसाद दिला हे ऐकून मी आनंदी आहे. मला आनंद आहे की आता मला जास्तीत जास्त वेगळे आणि आव्हानात्मक भूमिका करण्यास मिळतील”, असे बॉबी देओल म्हणाला.

तर या मुलाखतीत इंटीमेट सीनबद्दल ईशा म्हणाली, “जर तुम्ही सिनेसृष्टीत १० वर्षे काम केले असेल तर तुम्हाला अजिबात अस्वस्थ वाटून घेण्याचे कारण नाही. इंटिमेट सीन करणे ही एक समस्या आहे, असे अनेकांना वाटते. पण जर तुम्हाला खऱ्या आयुष्यात काहीही समस्या नसतील तर तुम्ही कोणताही सीन सहज करु शकता.”

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जेव्हा मी पहिल्यांदा इंटीमेट सीन शूट केला होता, तेव्हा माझ्यासाठी ते कठीण होते. पण जेव्हा तुम्ही एका चांगल्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन शूट करता तेव्हा तुम्हाला काहीही अडचण येत नाही. त्यामुळे ओटीटी, चित्रपट यातील इंटिमेट सीनचा काहीही फरक पडत नाही. फक्त तुम्हाला त्यातून आनंद मिळतो की नाही यावर ते अवलंबून आहे”, असेही ईशाने सांगितले.