बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. त्यांनी केवळ दाक्षिणात्य नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे. ते समाजातील घडामोडींवरही नेहमीच अगदी परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. त्यामुळे ते अनेकदा चर्चेतही असतात. परंतु आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.

प्रकाश राज यांनी तेलंगणा राज्यातील एक गाव दत्तक घेतले आहे. महबूबनगर जिल्ह्यातील त्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचं नाव ‘कोंडारपिले’ असं आहे. दत्तक घेतल्यानंतर या गावात स्थानिक आमदाराच्या मदतीने त्यांनी विकासकामे केली आहेत. प्रकाश राज यांनी दत्तक घेतल्यानंतर बदललेलं गावाचं रूप तेलंगणाचे शहर विकासमंत्री के.टी.आर यांनी शेअर केले आहेत.

हेही वाचा >> KBC 14 : साडेसात कोटींसाठी क्रिकेटवरील प्रश्नावर स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला उत्तर माहीत आहे का?

के.टी.आर यांनी ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत “हे गाव प्रकाश राज यांनी दत्तक घेतले आहे. स्थानिक आमदाराच्या मदतीने गावाचा केलेला विकास उल्लेखनीय आहे”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये गावातील रस्ते पक्के बनलेले दिसत आहेत. स्वच्छ, सुंदर रस्ते आणि त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली आहेत. प्रकाश राज यांनी गाव दत्तक घेऊन एक नवा आदर्श ठेवला आहे.

हेही वाचा >> “बॉलिवूड कॉलची वाट पाहतोय…”, हुबेहुब अनिल कपूरसारख्या दिसणाऱ्या विदेशातील व्यक्तीची पोस्ट व्हायरल

हेही पाहा >> Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश राज यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. वॉन्टेड, हिरोपंती, सिंघम, गोलमाल अगेन, दबंग या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका . त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटात साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.