सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट, म्हणाला होता… “धन्यवाद…”

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे

Bigg Boss 13 Winner  Sidharth Shukla Dead, Actor Siddharth Shukla Death
सिद्धार्थ शुक्लाने २४ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती ( photo indian express)

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ला ४० वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला आज मुंबईतील  कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचे निधन झाले. छोट्या पडद्यावरील मोठा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कमी वेळेत त्याने अनेक चाहत्यांचे मनं जिंकली होती. दरम्यान, सिद्धार्थची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिद्धार्थ शुक्लाने २४ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. आपला एक फोटो शेअर करत त्याने सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे आभार मानले होते. सिद्धार्थ शुक्लाने लिहिले होते, “सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांना दिलासा देता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! फ्रंटलाइनवर असणे सोपे नाही, परंतु आम्ही आपल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थ शुक्लाला टीव्ही सीरियल बालिका वौधमधून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो दिल से दिल तक या मालिकेतही दिसला. त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बिग बॉस १३ मधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलसोबत त्यांच्या जोडीला चांगलीच पसंत मिळाली होती. दोघेही अलीकडेच बिग बॉस OTT मध्ये दिसले होते. याशिवाय सिद्धार्थ शुक्लाने फियर फॅक्टर-खतरों के खिलाडी सीझन ७ मध्ये दिसला होता. त्यांनी सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट होस्ट केले होते. त्याची ब्रोकन हार्ट बट ब्यूटीफुल ही वेब सिरिज चांगलीच चर्चेत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor sidharth shukla death last instagram post before death thanks srk