अभिनेता विवेक ओबेरॉयने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा लेक. कंपनी चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाला सुरवात केली. मात्र त्याला ओळख मिळाली ती साथिया चित्रपटातून, अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत त्याने या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ‘काल’, ‘क्यू हो गया ना’, ‘मस्ती’, किस्नासारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विवेक ओबेरॉय गेली काही वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रिय नव्हता मात्र एका चित्रपटाने तो चर्चेत आला होता. तो चित्रपट म्हणजे ‘पीएम नरेंद्र मोदी’, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटात त्याने नरेंद्र मोदींची भूमिका साकारली होती.

विवेकने चित्रपट प्रदर्शित होण्याच्याआधी इंडियाटुडेला दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलं की ‘एका चहावाल्याची देशाचा पंतप्रधानपदी पोहचण्यापर्यंतची ही कथा आहे. ही एक प्रेरणादायी कथा आहे जी सांगणे आवश्यक आहे. मी हा चित्रपट केला कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला प्रेरणा दिली’. या चित्रपटासाठी विवेकने प्रचंड मेहनत घेतली होती. तो पुढे असं म्हणाला की ‘या चित्रपटासाठी तयारी करणे म्हणजे माझ्यासाठी एक तपस्या होती. कारण मला मेकअपसाठी ५ ते ६ तास लागायचे. जर सकाळी ७चे चित्रीकरण असेल तर माझा मेकअप रात्री १ वाजता सुरु व्हायचा.या चित्रपटात त्यांची नक्कल करण्यापेक्षा मला पडद्यावर त्याचे अनुकरण करायचे होते’.

“प्रभू श्रीराम आणि कृष्ण यांच्याप्रमाणे तुम्ही…” कंगनाने दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

हा चित्रपट २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर प्रदर्शित झाला होता. सरकार चित्रपटाचा वापर प्रचारासाठी करत असल्याचा आरोप करत, निवडणुकीपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याची मागणी विरोधी पक्षाकडून झाली होती. मात्र यावर विवेक ओबेरॉयने स्पष्टीकरण दिले होते की ‘हा चित्रपट प्रोपोगंडा नसून निवडणुकींच्या आधी प्रदर्शित होत आहे हा केवळ एक योगायोग आहे’.

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले होते. या चित्रपटात मनोज जोशी, दर्शन कुमार, बोमन इराणीसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले होते. या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनातील काही महत्वाचे टप्पे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, अहमदाबाद, उत्तराखंड येथे करण्यात आले होते. २४ मे २०१९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.