अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. विशेष म्हणजे चाहत्यांनी केलेल्या कमेंटवर ती कायम उत्तर देत तिचे मत मांडताना दिसते.

नुकतंच हेमांगीने तिच्या आगामी मालिकेचे एक पोस्टर फेसबुकवर शेअर केले आहे. ‘लेक माझी दुर्गा’ असे तिच्या आगामी मालिकेचे नाव आहे. ही मालिका बाप लेकीच्या नात्यावर देखील आधारित आहे. ही नवीन मराठी मालिका येत्या १४ फेब्रुवारीपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तिने तिच्या या आगामी मालिकेचे पोस्टर शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याखाली कमेंट केल्या आहे. या कमेंटद्वारे अनेकांनी तिला काही प्रश्नही विचारले आहेत. यावर तिनेही स्पष्टपणे मत मांडले आहे. यात एका नेटकऱ्याने तिला विचारले की ‘आता पोस्ट टाकायला वेळ मिळणार नाही’. त्यावर उत्तर देताना हेमांगी म्हणाली, “कुणी सांगितलं? मी माझ्या सोशल मीडियाच्या दोस्तांना विसरणार नाही! त्यांच्यासाठी वेळ काढणार, काळजी नसावी! तुम्ही मालिका पाहायला विसरू नका म्हणजे झालं!”.

तर एका नेटकऱ्याने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रश्न विचारला आहे. ‘पण जेष्ठ कलाकार विक्रम गोखले तर म्हणतायेत की भिकार सिरीयल बघायचे सोडा आता काय करायचं?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यावर उत्तर देताना हेमांगी कवी म्हणाली, “तुम्ही बघा आणि तुम्हीच ठरवा! सिरीयल बघायची कुणी आपल्यावर सक्ती करत नाही. बरेच पर्याय उपलब्ध आहेत.” तिचे हे उत्तर ऐकून त्या नेटकऱ्याने थम्ब इमोजी शेअर केला आहे.

तर त्यानंतर एका नेटकऱ्याने चक्क झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. “मॅडम जरा तुमची ओळख असेल झी मराठी वर, तर त्या स्वीटू ची मालिका बंद करायला सांगा ना, खूपच बोर होत आहे,” अशी मागणी त्या नेटकऱ्याने केली आहे. “त्यावर आपल्याकडे रिमोट आहे, चेंज करा किंवा आमची मालिका सुरू होईस्तोवर १४ फेब्रुवारीपर्यंत थोडी कळ सोसा”, असे उत्तर हेमांगीने दिले आहे. त्यावर त्या नेटकऱ्याने नक्कीच कळ सोसू, असे सांगितले आहे.

समांथाच्या शरीरावर असणाऱ्या तीन टॅटूंचा अर्थ आहे फारच खास, नागाचैतन्यशी आहे थेट कनेक्शन

दरम्यान कलर्स मराठीवर लवकरच ‘लेक माझी दुर्गा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. ही मालिका बाप लेकीच्या नात्यावर भाष्य करणारी असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. लेक माझी दुर्गा या नव्या मालिकेत हेमांगी कवी आणि सुशील इनामदार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.