Kajol Talks about Ajay Devgn Yashraj Films Fight : काजोलने २०१२ मधील वादग्रस्त परिस्थितीची आठवण करून दिली, जेव्हा तिचा पती अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ आणि आदित्य चोप्राचा ‘जब तक है जान’ बॉक्स ऑफिसवर भिडला होता.
अभिनेत्री काजोलने अलीकडेच एका मुलाखतीत २०१२ मध्ये अजय देवगण आणि ‘यशराज फिल्म्स’मधील तणावाबद्दल सांगितले. काजोलने सांगितले की, त्या वेळी ती भावनिक कोंडीतून जात होती. तिने सांगितले की, आदित्य चोप्रा तिचा जवळचा मित्र आहे. अजय देवगणच्या असलेल्या वादामुळे ती खूप अस्वस्थ होती. तिने सांगितले की, भांडणे नेहमीच कठीण असतात. विशेषतः जेव्हा ती सोडवली जात नाहीत.
भांडणे नेहमीच कठीण असतात : काजोल
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत याबद्दल बोलताना काजोल म्हणाली, “भांडणे नेहमीच कठीण असतात. विशेषतः जेव्हा ती काही काळासाठी मिटत नाहीत.” अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष आपापल्या मुद्द्यांवर ठाम राहतात, असे काजोल म्हणाली.
काजोल पुढे म्हणाली, “मी दोघांशी जोडलेली होते. म्हणून मला असे वाटले की, मी काहीही करू शकत नाही. मग तुम्हाला फक्त वेळेची वाट पाहावी लागते; जेणेकरून भावनांची तीव्रता थोड्या प्रमाणात शांत होईल आणि गोष्टी हळूहळू चांगल्या होतील.
या वादाबद्दल बोलताना काजोल म्हणाली, “बदल हा बदल असतो; चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो. कुठेतरी लिहिले आहे की, बदल हा शाश्वत असतो. आयुष्यात ती एकमेव कायमस्वरूपी गोष्ट आहे.” सन ऑफ सरदार आणि जब तक है जान हे चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाले. अजय देवगणच्या निर्मिती कंपनीने ‘यशराज फिल्म्स’विरुद्ध भारतीय स्पर्धा आयोगात तक्रार दाखल केली होती.
२०१२ मध्ये जेव्हा ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जब तक है जान’ एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार होते तेव्हा अजय देवगण आणि यशराज फिल्म्समध्ये जोरदार टक्कर झाली होती. अजयच्या कंपनीने भारतीय स्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) तक्रार दाखल केली होती की, यशराज फिल्म्सने ‘जब तक है जान’करिता अधिक स्क्रीन बुक करण्यासाठी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला, ज्यामुळे ‘सन ऑफ सरदार’ला योग्यरीत्या प्रदर्शित होण्यासाठी पुरेशा प्रमाणात थिएटर्स मिळाली नाहीत.
काजोल शेवटची विशाल फुरियाच्या पौराणिक हॉरर चित्रपट ‘माँ’मध्ये दिसली होती, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. आता काजोल इब्राहिम अली खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याबरोबर ‘सरजमीन’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ जुलै रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार २’ लवकरच येत आहे.