दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपट तुफान गाजला आणि अल्लू अर्जुन फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्येच नाही तर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज सर्वांच्याच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं. पुष्पाच्या प्रचंड यशानंतर काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केली. आता चित्रपटाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. एका लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीची या चित्रपटात वर्णी लागली आहे.

हेही वाचा : ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी पंकज त्रिपाठी नव्हते अनुराग कश्यपची पहिली पसंती, जाणून घ्या कसे बदलले नशीब

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ची चाहूल आजही चाहत्यांच्या मनावर आहे. हा चित्रपट दक्षिण पट्ट्यात तसेच उत्तर पट्ट्यात आणि देशभरात सुपरहिट ठरला. त्याच वेळी, पुष्पाचा सिक्वेल म्हणजेच ‘पुष्पा २’ देखील येणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्यानंतर, हे कळल्यापासून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक नवीन अपडेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, ‘पुष्प २’च्या चित्रीकर्नाळा २२ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. आता या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिची एंट्री झाली आहे. निर्माता-दिग्दर्शक सुकुमार यांनी साई पल्लवीशी संपर्क साधला आहे आणि ती या चित्रपटात एक अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘पुष्पा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रीकरणाचा मुहूर्तही ठरला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात ती एका आदिवासी महिलेच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या साई पल्लवीच्या पात्राबाबत आहेत.  साई पल्लवीला हे पात्र खूप आवडले असून तिने निर्मात्यांना होकार दिला आहे. परंतु निर्माते किंवा सई पल्लवी यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. साई पल्लवीचे फॅन फॉलोईंग हे तूफान आहे. त्यामुळे या बातमीने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसत आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि साई पल्लवी अशा सुपरस्टार्सना एकत्र स्क्रीन शेअर करताना बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.