scorecardresearch

Video : हातावर माईक मारला, फोन हिसकावून फेकून दिला अन्…; आदित्य नारायणच्या कृतीवर नेटकरी संतापले, म्हणाले…

कॉन्सर्टमध्ये आदित्यने चाहत्याबरोबर केलेल्या गैरवर्तनामुळे नेटकरी संतापले

aditya narayan gets angry shockingly hits fan
लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायणच्या कृतीवर नेटकरी संतापले (फोटो लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणही लोकप्रिय गायक आहे. आपल्या आवाजाच्या जोरावर आदित्यने गायनाच्या क्षेत्रात आपले वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर आदित्य मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आपल्या आवाजाबरोबरच आदित्य त्याच्या रागीट स्वभावामुळेही नेहमी चर्चेत असतो. दरम्यान, आदित्यचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एक कॉन्सर्टमधला आहे. छत्तीसगडच्या भिलाईमधील एका महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदित्य नारायणचा लाइव्ह कॉन्सर्ट शो ठेवण्यात आला होता. या कॉन्सर्टला हजारो युवक-युवतींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आदित्य एका चाहत्यावर खूपच भडकलेला दिसला. रागाच्या भरात त्याने चाहत्याचा मोबाईल हिसकावून लांब फेकून दिला असल्याचे बघायला मिळाले.

Narayan Range Manoj Jarange
“इथून पुढे धुवून काढेन”, नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर; निलेश राणेंना म्हणाले, “तुमच्या वडिलांना…”
Indira Gandhi, Nargis Dutt's names dropped from National Film Awards
मोदी सरकारचा मोठा निर्णय! इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचं नाव राष्ट्रीय पुरस्कार श्रेणीतून वगळलं
Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress in Marathi
“…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला?
Abhishk Ghosalkar News
अभिषेक घोसाळकरांचं पार्थिव पाहून वडिलांनी फोडला टाहो! पत्नी आणि मुलीचं रडणं मन हेलावून टाकणारं

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्य डॉन चित्रपटातील आज की रात गाणे गात होता. यावेळी अनेक प्रेक्षक आपल्या मोबाईलमधून त्याचा व्हिडीओ बनवत होते. कदाचित आदित्यला ही गोष्ट आवडली नाही. त्याने प्रेक्षकांमधील एका युवकाच्या हातातवर माईकने जोरजोरात फटका मारला व त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व त्यानंतर त्याने तो मोबाईल लांब फेकून दिला. सोशल मीडियावर आदित्यचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओ कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे.

हेही वाचा- “मला लग्नाची तारीख सांगायला लाज वाटते, कारण…”; अर्शद वारसीचं वक्तव्य, २५ वर्षांच्या संसारानंतर घेतला मोठा निर्णय

व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले- ‘आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? त्याला कशाचा इतका गर्व आहे? स्वतःच्या चाहत्यांचा अनादर.’ दुसऱ्याने लिहिले- ‘त्याची ही वृत्ती संतापजनक आहे. त्या व्यक्तीच्या हातावर माईक मारला.” मात्र, आदित्यची राग अनावर होण्याची ही पहिलीच घटना नाही. या अगोदरही अनेकदा तो आपल्या रागीट स्वभावामुळे चर्चेत आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aditya narayan gets angry shockingly hits fan snatches phone and throws it away during concert video viral dpj

First published on: 12-02-2024 at 14:35 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×