क्रांती रेडकरच्या पतीचं होतंय सोशल मीडियावर कौतुक, जाणून घ्या कारण

तिचे पती एनसीबीचे अधिकारी आहेत.

krani redkar, sameer wankhede,

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून (NCB) तपास सुरु होता. आता एनसीबीने सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

समीर हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले तेव्हा अनेक तारे-तारकांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. आता सुशांतच्या रुममेटला अटक केल्यानंतर त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Photos: सोनाली कुलकर्णीचे दुबईतील आलिशान घर पाहिलेत का?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण लागणार असा प्रश्न उभा राहत आहे. या प्रकरणात सीबीआयही तपास करत होती. सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीने ड्र्ग्ज पुरवल्याचा आरोप तिच्यावर होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्याने नैराश्यात असल्यामुळे इतके टोकाचे पाऊल उचले असल्याचे म्हटले जात होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After arresting siddharth pithani netizens thanking kranti redkar husband sameer wankhede avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या