‘शमशेरा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. रणबीर कपूरने एका कार्यक्रमात कबूल केलं की चित्रपटाच्या कथानकामध्ये फारसा काही दम नव्हता. नुकताच त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा चांगली कमाई केली आहे. तब्बल ३६० कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने अवघ्या १० दिवसात केली आहे. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर चाललेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे पुढील भागदेखील येणार आहेत. रणबीर कपूर आता पुन्हा एकदा कामाला लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कबीर खानचे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांच्या ‘अॅनिमल’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मिड डेच्या माहितीनुसार णबीर कपूर ऑक्टोबरमध्ये अॅनिमलचे शूटिंग पुन्हा सुरू करणार आहे. “रणबीर आणि आलिया सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत ब्रह्मास्त्रचे प्रमोशन करत राहतील. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, रणबीर अनिल कपूर अॅनिमलच्या मुंबई शेड्यूलची सुरुवात करतील. चेंबूरपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात होणार आहे, मुंबईच्या विविध भागांमध्ये हा चित्रित केला जाणार आहे. या चित्रपटाचा टिझर आधीच प्रदर्शित झाला आहे.

लोकांना हसवणारा विनोदी अभिनेता ‘कपिल शर्मा’ दिसणार वेगळ्याच भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

संदीप रेड्डी वंगा हे अॅनिमलचे दिग्दर्शन करत आहेत, ज्यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. परिणीती चोप्रा या चित्रपटाची प्रमुख महिला होती पण तिने चित्रपट सोडला. तिच्या बाहेर पडल्यानंतर, रश्मिका मंदान्ना स्त्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणबीर आणि रश्मिकाशिवाय या चित्रपटात बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत.

एप्रिल महिन्यात रणबीर आणि रश्मिकाने मनालीमध्ये संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमलसाठी चित्रीकरण केले.चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरीज, मुराद खेतानी यांच्या सिनी1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After brahmastras success actor ranbir kapoor to resume animalshooting in october spg
First published on: 19-09-2022 at 18:50 IST