scorecardresearch

लेक न्यासा कधी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? अजय देवगणनं दिलं उत्तर

मुलीच्या बॉलिवूड पदार्पणावर आता अजय देवगणनं अखेर मौन सोडलं आहे.

ajay devgan, ajay devgan reaction, ajay devgan daughter, nysa devgn, kajol, ajay kajol daughter, अजय देवगण, न्यासा देवगण, अजय देवगण मुलगी, काजोल, न्यासा देवगण बॉलिवूड पदार्पण
अजय देवगणची मुलगी न्यासा सध्या परदेशात शिक्षण घेत आहे.

अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. न्यासाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता असलेली दिसून येते. नुकतंच जेव्हा याबाबत अजय देवगणला विचारण्यात आलं त्यावेळी त्यानं न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

अजय देवगणची मुलगी न्यासा सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. मात्र ती बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत मुलीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाला, ‘मला माहीतच नाही की, तिला या क्षेत्रात यायचं आहे की नाही. अद्याप तिनं या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्याही प्रकारची रुची दाखवलेली नाही. पण मुलांसोबत अनेक गोष्टी अचानक बदलतात. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकतं. सध्या ती परदेशात असून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे.’

आणखी वाचा- “मी अशाप्रकारचे चित्रपट…” सोनू निगमनं सांगितलं ‘द कश्मीर फाइल्स’ न पाहण्याचं कारण

न्यासा देवगण सध्या स्वीझरलँडच्या Glion Institute of Higher Education मध्ये आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचं शिक्षण घेत आहे. त्याआधी तिनं ३ वर्षांपूर्वी सिंगापूरमधून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. न्यासाचा जन्म २००३ साली झाला होता. अजय देवगण आणि काजोल यांना न्यासा व्यतिरिक्त युग हा एक मुलगा देखील आहे.

आणखी वाचा- “अरे गप्प बस…” रणबीर- आलियाच्या लग्नावर शिल्पा शेट्टीची धक्कादायक प्रतिक्रिया

अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘रनवे ३४’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच अजय देवगणनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रकुलप्रीत सिंह आणि आकांक्षा सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajay devgan reacts on daughter nysa devgn bollywood debut mrj

ताज्या बातम्या