scorecardresearch

Akanksha Dubey Suicide: आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड समर सिंहविरोधात गुन्हा दाखल, अभिनेत्रीच्या कुटुंबाने केलेले गंभीर आरोप

आकांक्षा दुबेच्या कुटुंबाने बॉयफ्रेंड समर सिंहवर अभिनेत्रीच्या हत्येचा आरोप केला होता.

akanksha dubey suicide case (2)
आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड समर सिंहविरोधात गुन्हा दाखल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी(२६ मार्च) आत्महत्या केली. आकांक्षाने वाराणसीमधील हॉटेलमध्ये गळफास घेत जीवन संपवलं. २५ वर्षीय आकांक्षाच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. आकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.

आकांक्षाच्या आत्महत्येप्रकरणी बॉयफ्रेंड समर सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या आईने समर सिंह व त्याचा भाऊ संजय सिंहविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एसीपी संतोष कुमार यांनी ही माहिती दिली आहे. आकांक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अभिनेत्रीच्या आईने केला होता. आकांक्षाच्या आईने भोजपूरी गायक व अभिनेता समर सिंहला अभिनेत्रीच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं.

हेही वाचा>> “समर सिंह आणि त्याच्या भावाने हत्या केली” २५व्या वर्षी आत्महत्या केलेल्या आकांक्षा दुबेच्या आईचे गायकावर गंभीर आरोप, म्हणाल्या “त्याने २१ मार्चला…”

आकांक्षाची हत्या करुन समर सिंहने तिच्या खोलीच्या दरवाजाला बाहेरुन टाळा लावल्याचं अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी म्हटलं होतं. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. एसीपी संतोष कुमार म्हणाले, “आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा आतमधून बंद होता. आत्महत्या करण्यापूर्वी आकांक्षा रात्री एका पार्टीत सहभागी झाली होती. तिच्या फोनमधून काही व्हिडीओ मिळाले आहेत. ज्यामध्ये ती रडत असल्याचं दिसत आहे”. आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा>> आकांक्षा दुबे समर सिंहबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती? अभिनेत्रीच्या निधनानंतर कुटुंबियांचा खुलासा, म्हणाले “तो तिच्या…”

आकांक्षा दुबे व समर सिंह यांचे प्रेमसंबंध होते. आकांक्षाने महिन्याभरापूर्वीच प्रेमाची कबुली दिली होती. व्हॅलेंटाइन डेला तिने समर सिंहबरोबरचा फोटो शेअर करत हार्ट इमोजी पोस्ट केले होते. त्या दोघांनी अनेक गाण्यांमध्ये एकत्र काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:32 IST

संबंधित बातम्या