scorecardresearch

अक्षय कुमार आणि लिओनार्दो दि कॅप्रिओ यांना पुरस्कार जाहीर; पर्यावरण संवर्धनासंदर्भातील कामाचा सन्मान

गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित

अक्षय कुमार आणि लिओनार्दो दि कॅप्रिओ यांना पुरस्कार जाहीर; पर्यावरण संवर्धनासंदर्भातील कामाचा सन्मान

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जगभरातील कलाकार, सेलिब्रिटी दीर्घकाळापासून काम करत आहेत. भारतातलेही काही आघाडीचे कलाकार अशा सामाजिक कार्यांमध्ये सहभागी आहेत, अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता अक्षय कुमार हा त्यापैकीच एक. त्याच्या कार्यासाठी त्याला एक मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

पर्यावरणासंबंधित कामासाठी अभिनेता अक्षय कुमारला गोल्डन ग्लोब ऑनर्स फाऊंडेशनतर्फे सन्मानित करण्यात आलं आहे. त्याच्यासोबत हॉलिवूड अभिनेता लिओनार्दो दि कॅप्रिओ यालाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार भारतातल्या स्वच्छतेच्या प्रश्नाबद्दल सतत काम करत असतो. लोकांना प्रोत्साहन देत, त्यांच्यात जागरुकता निर्माम करण्याचे काम करत असतो. तर लिओनार्दो दि कॅप्रिओ जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी, महासागर आणि जंगलांच्या संवर्धनासाठी तसंच हवामान बदलाच्या प्रश्नावर काम करत आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

या यादीत अभिनेत्री एमा वॅटसन आणि सारा मार्गारेट क्वाले यांचाही समावेश आहे.

बॉलिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटी काही ना काही सामाजिक काम करत आहेत. दिया मिर्झा पर्यावरणासंदर्भात युनिसेफ या संघटनेची ब्रँड अम्बॅसिडर आहे तर अजय देवगण पर्यावरणपूरक उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात काम करत आहे. हवामान बदलाच्या संदर्भात अमिताभ आणि अभिषेक बच्चनही काम करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-04-2021 at 19:14 IST