बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ अनेक चित्रपटांची घोषणा करत आहे. यामुळे त्याचे चाहते फारच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘सूर्यवंशी’, ‘अतरंगी रे’, ‘बच्चन पांडे’ यानंतर आता अक्षय कुमारने त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी पाच ते सहा चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अक्षय कुमार लवकरच अभिनेता टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा ‘बडे मियाँ’ची भूमिका साकारत आहे. तर टायगर श्रॉफ हा ‘छोटे मियाँ’ची भूमिका साकारताना दिसत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरणार असल्याची प्रतिक्रिया अनेकजण देताना दिसत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत ट्विटरवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने टायगर श्रॉफला टॅग केले आहे. “ज्यावर्षी तू या जगात पदार्पण केलेस म्हणजे जन्म घेतलास, त्याच वर्षी मी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तरीही तू माझ्याशी सामना करणार आहेस का, छोटे मियाँ? चला तर मग करुया फुल अॅक्शन”, असे त्याने म्हटले आहे.

या चित्रपट अॅक्शनने खचाखच भरलेला असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन आणि गोविंदाचा यांचा लोकप्रिय चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ (१९९८)’ चा टायटल ट्रॅकही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. तर पूजा एन्टरटेन्मेंट आणि वाशू भगनानी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यात अक्षय कुमार हा ‘बडे मियाँ’ची भूमिका साकारणार आहे. तर टायगर श्रॉफ हा ‘छोटे मियाँ’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.