बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार्स अनेकदा त्यांच्या प्रॉपर्टीच्या खरेदी – विक्रीमुळे चर्चेत असतात. मध्यंतरीच शाहिद कपूर, मिलिंद सोमण, अमिताभ बच्चन यांनी नवीन घरे विकत घेतली. आता त्या यादीत अक्षय कुमारचेही नाव सामील झाले आहे. अक्षय कुमारने हृतिक रोशनचे घर खरेदी केल्याची बातमी आहे.

आणखी वाचा : “आज मी तुमच्यामुळे…”, रश्मिका मंदानाने माधुरी दीक्षितबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

विभक्त होण्यापूर्वी हृतिक रोशन आणि सुझान खान त्यांच्या कुटुंबासह जुहूमध्ये त्यांच्या वडिलोपार्जित बंगल्यात राहत होते. पण सुझानपासून विभक्त झाल्यानंतर हृतिक रोशन त्याच भागातल्या पलाझो अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला. तिथे तो आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. बरेच महिने हृतिक त्याच्या आई-वडिलांबरोबर त्या घरी राहिला आणि अलीकडेच तो जुहू वर्सोवा येथील ‘वर्तमान’ अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला आहे.

आता असे म्हटले जात आहे की हृतिक रोशन सुझानबरोबर ज्या बांगल्यात राहत होता ते घर अक्षय कुमारने खरेदी केले आहे. हृतिक रोशनने हे जुहूचे घर सोडण्यापूर्वीच अक्षय कुमारने ते खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अक्षय कुमारने हा करार केला आहे की नाही, याबाबत आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण त्यांनी या घराचा करार पक्का केल्याचे बोलले जात आहे. हृतिक रोशनचे हे जुहूचे घर त्याचे आजोबा जे. ओमप्रकाश यांचे होते. जे. ओमप्रकाश हेही चित्रपट निर्माते होते. त्यांच्या पश्चात त्यांनी हा आलिशान बंगला मागे सोडला आहे. या बंगल्याची एकमेव वारस हृतिक रोशनची आई पिंकी रोशन आहे.

हेही वाचा : ‘विक्रम वेधा’ चित्रपटासाठी हृतिक रोशनने आकारली सैफ अली खानच्या रकमेच्या चौपट रक्कम, घेतले ‘इतके’ कोटी मानधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हृतिक रोशन व्यवसायिक आयुष्याबरोबर वैयक्तिक आयुष्यावरूनही चर्चेत असतो. त्याचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तर सुझानपासून विभक्त झाल्यानंतर हृतिक त्याच्या लव्ह लाईफबद्दल देखील चर्चेत आहे. हृतिक रोशन बऱ्याच महिन्यांपासून सबा आझादबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.