‘आयला रे आयला’, सूर्यवंशी चित्रपटचा भन्नाट टीझर पाहिलात का?

५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aila Re Aillaa, Aila Re Aillaa Teaser, Aila Re Aillaa song, sooryavanshi song Aila Re Aillaa,

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रदर्शित झाला आहे.

अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत ‘येत्या दिवाळीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : जगभरात धुमाकूळ घालणारा ‘बाहुबली’ आता मराठीमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

येत्या २१ ऑक्टोबरपासून ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे. यादिवशी मोठे प्रमोशन केले जाणार आहे. याच दिवशी चित्रपटातील एक गाणेही लाँच केले जाणार आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तर २४ ऑक्टोबरला चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित होणार आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे.

शुक्रवारी १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या शुभमुहर्तावर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन (CBFC) सीईओ रविंद्र भाकड यांना ‘सूर्यवंशी’ चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडून त्याला U/A सर्टिफिकेट मिळाले आहे. तसेच या चित्रपटातील कोणाताही सीन वगळला किंवा कापला जाणार नाही, असेही सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता चित्रपटगृहे सुरु होणार असल्यामुळे चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar ranveer singh sooryavanshi aila re aillaa teaser out avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन