बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट उद्या ५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतासह अनेक देशात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. जवळपास ५ हजार २०० स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘सूर्यवंशी’च्या संपूर्ण टीमने ‘द कपिल शर्मा शो’ या प्रसिद्ध शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कतरिनाने एका चित्रिकरणादरम्यान “मी अक्षयला खरोखरच कानाखाली मारली,” असा खुलासा तिने यावेळी केला.
‘द कपिल शर्मा’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटात्या प्रमोशनसाठी हजेरी लावतात. नुकतंच या शोमध्ये ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. यावेळी अक्षय कुमार, कतरिना कैफसह अनेक कलाकार उपस्थित होते. ‘सूर्यंवशी’च्या टीमसोबतचा हा संपूर्ण भाग येत्या शनिवार, रविवारी प्रदर्शित केला जाणार आहे.
या शो दरम्यान कपिलने कतरिनाला शूटींगदरम्यान आणि चित्रपटाबद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी कपिलने विचारले की, “चित्रपटात कतरिना अक्षयला कानाखाली मारते, असा एक सीन आहे. या सीनच्या वेळी किती रिटेक घेण्यात आले?” असा प्रश्न तिला विचारला. त्यावेळी कतरिना क्षणार्धात म्हणाली, “एकही नाही. चित्रपटात कानाखाली मारण्याचा सीनदरम्यान एकही रिटेक घेण्यात आला नाही. तो संपूर्ण सीन एकदाच शूट करण्यात आला होता. यावेळी मी त्याला खरोखरच कानाखाली मारली,” असे ती हसत हसत म्हणाली.
यावर अक्षय म्हणाला, “हे खरोखर झाले होते. तिने मला खरच मारले होते. कारण कधीकधी कानाखाली मारण्याच्या सीनमध्ये एकमेकांमधील अंतर दिसते. त्यामुळे तिने मला खरोखर कानाखाली मारली.”
यानंतर कपिलने तिला विचारले, मग “रोमँटिक सीनबद्दल काय? यावेळी तुम्ही किती रिटेक घेतले?”, त्यावर ती म्हणाली की “अक्षयसोबत माझे ट्यूनिंग फार चांगले आहे. त्यामुळे आम्ही रोमँटिक सीनमध्ये जास्त रिटेक घेत नाही,” असे तिने स्पष्ट केले. दरम्यान कतरिना आणि अक्षयने आतापर्यंत सहा चित्रपटात काम केले आहे. यात हमको दिवाना कर गये, नमस्ते लंडन, सिंग इज किंग, वेलकम, दे दना दन आणि तीस मार खान या चित्रपटात अक्षय-कतरिनाची केमिस्ट्री पाहायाला मिळाली होती.
५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर येत्या ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
पाहा व्हिडीओ :