scorecardresearch

अक्षय कुमार पुन्हा दिसणार वकिलाच्या भूमिकेत, ‘जॉली एलएलबी ३’ शूटींगला लवकरच होणार सुरुवात

जॉली एलएलबी या सिनेमाच्या सिरीजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमार पुन्हा दिसणार वकिलाच्या भूमिकेत, ‘जॉली एलएलबी ३’ शूटींगला लवकरच होणार सुरुवात
अभिनेता अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हे दोन्ही सिनेमे ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी अतिशय थंड प्रतिसाद दिला. आमिर खानच्या सिनेमाला बॉयकॉट करा असा ट्रेंड सुरू होता आणि त्याचा फटका काही कारणास्तव अक्षयच्या सिनेमाला सुद्धा बसला आहे. आता अशातच अक्षय कुमार त्याच्या आणखी एका सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

जॉली एलएलबी या सिनेमाच्या सिरीजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉली एलएलबी २ प्रमाणेच याच्या तिसऱ्या भागातसुद्धा अक्षय कुमार जगदीश्वर मिश्रा या वकिलाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्षयच्या या भूमिकेला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता स्टार स्टुडिओज आणि सुभाष कपूर या दोन्ही निर्मात्यांनी याच्या सिनेमाच्या तिसऱ्या भागावर काम करायला सुरुवात केली आहे.

“तीन महिन्यात नवीन चित्रपट…” ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर निलेश साबळेने उडवली अक्षय कुमारची खिल्ली

या सिनेमाची कथा तयार करण्यात आली आहे. यात अक्षय कुमार व्यतिरिक्त कोणकोणते कलाकार असणार याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र २०२३ च्या सुरुवातीला या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे २०२३ वर्षाअखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी निर्माते आणि संपूर्ण टीम सज्ज असल्याचं समोर आलं आहे.

अक्षय कुमारचा सूर्यवंशी सोडला तर बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, आणि नुकताच आलेला रक्षाबंधन हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले आहेत. त्यातच अक्षय हा जॉली एलएलबीसह राम सेतू, बडे मियाँ छोटे मियाँ, ओह माय गॉड २ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमांना लोकं कसा प्रतिसाद देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

आणखी वाचा – ‘सम्राट पृथ्वीराज’चे अपयश ‘रक्षाबंधन’ पुसणार का? पाहा ट्रेलर

दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या स्टेट विरुद्ध जॉली एलएलबी या पहिल्या भागात अर्षद वारसी मुख्य भूमिकेत होता. तसेच बोमन इराणी आणि सौरभ शुक्ला सारखे अभिनेतेदेखील सहाय्यक भूमिकेत दिसले होते. अर्षद आणि बोमन या दोघांच्या भूमिका लोकांना चांगल्याच पसंत पडल्या. तसेच या पहिल्या भागाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला. त्यानंतर सुभाष यांनी अक्षय कुमारला घेऊन या सिरीजमधला दुसरा भाग दिग्दर्शित केला. त्यामुळेच आता जॉली एलएलबी ३ बद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. सुभाष कपूर यांनी फस गये रे ओबामा, मॅडम चीफ मिनिस्टर या लोकप्रिय सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या