अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूर यांचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट सध्या बऱ्याच चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बेल बॉटम’ येत्या गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॉकडाऊन नंतर हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे जो प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहू शकतील.
‘बेल बॉटम’ हा चित्रपट पाहाण्यासाठी आता तुम्ही अगोदर बुकिंग देखील करू शकतात. अक्षयने एक इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत काही लिंक शेअर केल्या आहेत. या लिंकवरुन तुम्ही चित्रपटाचे तिकीट आरक्षित करु शकतात असे त्याने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे. ‘बेल बॉटम’या चित्रपटात अपहरण झालेल्या विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी सरकारकडून एका खास व्यक्तीची नेमणूक करण्यात येते ती व्यक्ति म्हणजेच अक्षय कुमार. पुन्हा एकदा अक्षय कुमारची अॅक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्षय आपल्या टीमच्या मदतीने कशा प्रकारे हे ऑपरेशन हाताळतो आणि प्रवाशांची सुटका करतो याचा थरार या चित्रपटात पाहायला मिळेल.
View this post on Instagram
पूजा एंटरटेनमेंटचा बहुचर्चित ‘बेल बॉटम’ हा चित्रपटा लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहत प्रदर्शित होणार पाहिला चित्रपट आहे. हा चित्रपटा पॅन इंडियाच्या अंतर्गत प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटामुळे आता बाकी निर्मात्यांना देखील त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. अक्षय कुमार आणि बेल बॉटम चित्रपटाचे निर्माते जॅकी भग्नानी आणि दिपशिखा देशमुख यांचे चित्रपटगृह, वितरकांकडून प्रचंड कौतुक केले जात आहे. तसंच त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण सिनेसृष्टी त्यांना सपोर्ट करताना दिसत आहे.
‘बेल बॉटम’ या चित्रपटात तुम्ही अक्षय कुमार आणि वाणी कपूर बरोबरच लारा दत्ता, हुमा कुरेशी देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट १९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.