बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. रिचा आणि अली दोघांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहित आहे, त्यामुळे रिचा अलीबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच ती अनेकदा त्यांच्या नात्यावर उघडपणे व्यक्तही होत असते. या दोघांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अशातच दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिकेत जुन्या काळातील रोमान्सची झलक स्पष्टपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा : Raju Srivastava : जेव्हा राजू श्रीवास्तव यांच्या घरी झाली होती चोरी…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या लग्नपत्रिकेची झलक पाहून ही लग्नपत्रिका किती मनोरंजक आणि नावीन्यपूर्ण आहे हे स्पष्ट होत आहे. रिचा आणि अलीच्या लग्नाची पत्रिका रेट्रो थीमवर आहे. रिचा आणि अलीच्या मित्राने त्यांच्यासाठी ही लग्नपत्रिका तयार केली आहे. या पत्रिकेत रिचा आणि अलीच्या चेहऱ्याचे पॉप आर्ट डिझाइनमध्ये रेखाटले आहे. या जोडप्याच्या लग्नपत्रिकेवर माचिसच्या आकारात ९० च्या दशकातील रेट्रो फील आहे. त्यावर ‘कपल मॅचेस’ असे लिहिलेले आहे. या पत्रिकेत रिचा आणि अली पारंपरिक कपड्यांमध्ये सायकल चालवताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “विचार केला आधी थोडे पैसै कमवावे…”; रिचासोबत लग्न करण्याच्या प्रश्नावर अली फजलचं उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिचा चढ्ढा आणि अली फजल ४ ऑक्टोबरला विवाहबद्ध होणार आहेत. पण लग्नपत्रिकेतील बहुतांश तपशील लपवण्यात आला आहे. सध्या हे दोघे  रिचाच्या लग्नाचे दागिने बिकानेरमधील १७५ वर्षीय जुने ज्वेलर्स दागिने तयार करत आहेत. त्यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन ३० सप्टेंबर रोजी दिल्ली जिमखाना येथून सुरू होईल. तेथे हा उत्सव ३ दिवस चालणार आहे. १ ऑक्टोबर रोजी मेहंदी आणि संगीत होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी रिचा आणि अली नातेवाईक आणि खास मित्रमंडळींसाठी लग्नाची पार्टी देणार आहेत.