अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच आलियानं या विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली. आलियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटींनी देखील कमेंट करत या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफचा देखील समावेश आहे. आलियाच्या फोटोवरील कतरिनाची कमेंट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

आलिया भट्टच्या इन्स्टाग्राम पोस्टवर सोनम कपूर, जेनेलिया डिसूजा, माधुरी दीक्षित, टाइगर श्रॉफ, तमन्ना भाटिया, जान्हवी कपूर, अनिल कपूर, सोनू सूद, दीया मिर्जा, मौनी रॉय, मनीष मल्होत्रा यासांरख्या सेलिब्रेटींनी कमेंट करून तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. आलियाच्या लग्नाचे हे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. पण यासोबतच चर्चेत आहे ती कतरिना कैफची आलियाच्या लग्नाच्या फोटोवरील कमेंट.

आणखी वाचा- रणबीर कपूरच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणनं अखेर सोडलं मौन, प्रतिक्रिया चर्चेत

आलियानं हे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘आज आमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या समोर, आमच्या घरी… बाल्कनीतील आमच्या आवडत्या ठिकाणी… जिथे आम्ही पाच वर्षे एकमेकांसोबत व्यतित केली त्याच ठिकाणी आज आम्ही लग्न केले. या जागेसोबत आमच्या असंख्य आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि भविष्यातही अनेक आठवणी जोडल्या जातील. आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम, रणबीर आणि आलिया.’

आलियाच्या या पोस्टवर कमेंट करताना कतरिनानं कमेंट केली आहे. तिने लिहिलं, ‘तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा. खूप सारं प्रेम, मी तुमच्या आनंदाची कामना करते. तुमचं आयुष्य आनंदानं बहरुन जावं हीच इच्छा.’ एकेकाळी रणबीर कपूरची गर्लफ्रेंड असेल्या कतरिना कैफची आलियाच्या फोटोवरील ही कमेंट सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.

आणखी वाचा- Video : आलिया सर्वांसमोर रणबीरसोबत असं वागली की सगळीकडे झाली होती चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आलिया आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या या विवाहसोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय आणि काही मोजके नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाच्या सर्व विधी पंजाबी रितीरिवाजा प्रमाणे पार पडल्या. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.