बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. हे दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं मागच्या बऱ्याच काळापासून बोललं जात आहे. आलिया- रणबीरचे चाहतेही त्यांच्या लग्नसाठी खूप उत्सुक आहेत. पण आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं लग्न अगोदरच झालेलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे आलिया भट्टनं एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य.

आलिया भट्टनं एका मुलाखतीत तिचं रणबीर कपूरशी अगोदरच लग्न झालं आहे असं वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. पण यात मोठा ट्वीस्ट आहे. ‘एनडीटी’ला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, ‘मी बऱ्याच वर्षांपूर्वी रणबीर कपूरशी लग्न केलं आहे माझ्या मनात.’ म्हणजेच आलिया आणि रणबीरचं खरंच लग्न झालेलं नाही.  

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याआधी एका मुलाखतीत रणबीर कपूरनं त्याच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यानं, करोना आणि लॉकडाऊन नसतं तर आमचं लग्न कधीच झालं असतं असं म्हटलं होतं. एकीकडे रणबीरच्या बोलण्यावरून तो आलियाशी लग्न करण्यासाठी किती उत्सुक आहे हे लक्षात येत. तर दुसरीकडे आलियाच्या वक्तव्यावरून तिने रणबीरला मनात आपला पती मानलं असल्याचं समजतं.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर हे दोघंही लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं असून यात अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.