scorecardresearch

‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आघाडीचा बॉलिवूड स्टार, दिग्दर्शक करत आहे ‘या’ दोन नावांचा विचार

‘पुष्पा २’मध्ये या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक एका बॉलिवूड अभिनेत्याला महत्वपूर्ण भूमिकेत घेणार आहेत.

allu-arjun-2

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर ‘पुष्पा’ला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर या चित्रपटाची टीम काम करत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनबरोबर एक आघाडीचा बॉलिवूड अभिनेता झाळकणार असल्याचं आता समोर आलं आहे.

‘पुष्पा’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा दिग्दर्शक सुकुमार यांनी केली होती. त्यामुळे प्रेक्षकांनाही ‘पुष्पा २’बद्दल आतुरता होती. ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून या चित्रपटाबद्दल एकेक अपडेट्स समोर येऊ लागले आहेत. आता या चित्रपटाबद्दलची मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ‘पुष्पा २’मध्ये या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक एका बॉलिवूड अभिनेत्याला महत्वपूर्ण भूमिकेत घेणार आहेत.

आणखी वाचा : शाहरुख आणि सलमानच्या आगामी चित्रपटांना मागे टाकत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ने रचला नवा विक्रम

या ॲक्शन ड्रामा चित्रपटात अल्लू अर्जुन बरोबरच फहाद फाजिल, रश्मिका मंदाना दिसणार आहेत. तर त्यांच्याबरोबर पहिल्या भागाप्रमाणेच अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही एका गाण्यावर डान्स करताना दिसेल असं बोललं जात आहे. यांच्याबरोबरच या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते एका आघाडीच्या बॉलीवूड स्टारला कास्ट करण्याचा विचार करत आहेत. रिपोर्ट्सनुसार ते सलमान खान किंवा अजय देवगणला ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनच्या तोडीस तोड भूमिकेत घेतील. पण अद्याप याबाबत कोणीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे अल्लू अर्जुनबरोबर कुठला बॉलिवूड स्टार ‘पुष्पा २’मध्ये दिसेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : ‘पुष्पा २’मध्ये लागली ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी, पहिल्यांदाच दिसणार रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनबरोबर

दरम्यान दिग्दर्शकाला घाईघाईत शुटिंग संपवून ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा नाही आहे. त्यामुळे २०२४च्या मार्च-एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो असं म्हटलं जात आहे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 19:31 IST

संबंधित बातम्या