जाहिरातीच्या सेटवर अमिताभ आणि जया बच्चन पुन्हा एकत्र

या दोघांची उपस्थिती कोणत्याही जाहिरातीची शोभा वाढवणारी असते

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन

बॉलिवूडमधील ‘गोल्डन कपल’ म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे कधीही एकत्र दिसले की प्रसारमाध्यमांच्या नजरा त्यांच्याकडेच वळतात. या जोडीमध्ये असे काही तरी वेगळे आहे की, लग्नाच्या एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्यावरून नजर हटत नाही. नुकतेच त्यांनी एका जाहिरातीसाठी शूट केले. या शूटदरम्यानचा एक फोटो बिग बी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी म्हटले की, ‘एका जाहिरातीसाठी बायकोसोबत काम करत आहे. सावधान!! बायकोसोबत शूट.’

गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ आणि जया हे एका ज्वेलरी ब्रॅण्डचे अॅम्बेसिडर आहेत. या दोघांची उपस्थिती कोणत्याही जाहिरातीची शोभा वाढवणारी असते. त्यामुळे या जाहिरातीतही या दोघांशिवाय अन्य कोणत्याही गोष्टींकडे लक्ष जाणार नाही हे सर्वांनाच माहीत आहे. या जाहिरातीमध्ये दोघांनीही सारख्याच रंगाचे कपडे घातले आहेत.

जया आणि अमिताभ यांचे आतापर्यंत अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील. पण त्या सर्व फोटोंमध्ये चाहत्यांना हा फोटो नक्कीच आवडेल यात काही शंका नाही. अमिताभ यांच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, बिग बी ‘पॅडमॅन’, ‘१०२ नॉट आऊट’ आणि ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय लवकरच ते नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात करणार आहेत.

या सिनेमात ते नागपूरमध्ये जवळपास दशकभरापूर्वी ‘स्लम सॉकर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करणारे विजय बार्से यांची भूमिका साकारताना दिसतील. फुटबॉल खेळात आपले भवितव्य घडवण्यासाठी ही संस्था गरीब मुलांना मदत करते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amitabh bachchan and jaya bachchan together for the shoot