scorecardresearch

KBC 13: “कॉलेजचे ते दिवस आठवले”; अमिताभ बच्चन यांनी क्रिती सेनॉनसोबत केला खास डान्स

शानदार शुक्रवारच्या खास भागात क्रिती सेनॉन हजेरी लावणार आहे. या भागातील एक खास फोटो बिग बींनी शेअर केलाय.

KBC 13: “कॉलेजचे ते दिवस आठवले”; अमिताभ बच्चन यांनी क्रिती सेनॉनसोबत केला खास डान्स

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर कायमच जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. मात्र नुकतीच एका अभिनेत्रीने बिग बींना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण करुन दिलीय. बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यात त्यांनी कॉलेजच्या आणि कलकत्तामधील दिवसांची आठवण झाल्याचं म्हंटलंय.

‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये दर शुक्रवारी विविध क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्ती आणि सेलिब्रिटी हजेरी लावत असता. येत्या शुक्रवारी या खास भागात अभिनेत्री क्रिती सेनॉन हजेरी लावणार आहे. या खास एपिसोडचा एक फोटो बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या फोटोत ते क्रितीसोबत बॉलरूम डान्स करताना दिसत आहेत. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ते म्हणाले, ” रेड ड्रेस परिधान करून आलेल्या क्रिती सेनॉनसोबत बॉलरुम डान्स केला….आह… कॉलेज आणि कलकत्तामधील जुन्या दिवसांची आठवण झाली.” असं सुंदर कॅप्शन त्यांनी दिलंय.

धमाका’ करण्यासाठी कार्तिक आर्यन सज्ज, सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज

‘तो हात कुणाचा?’, नेटकऱ्यांनी शोधून काढली बिग बींच्या जाहिरातीमधील मोठी चूक

कलकत्तामध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिली नोकरी सुरु केली होती. त्यामुळे कलकत्ता शहराशी त्यांचं खास नातं आहे. या खास भागात बिग बी त्यांच्या कलकत्तामध्ये घालवलेल्या दिवसांचा किंना कॉलेजमधील एखादा खास किस्सा शेअर करताना दिसतील.

शानदार शुक्रवार या खास भागत वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात या सेलिब्रिटींसोबत बिग बी धमाल गप्पा आणि मजा मस्ती करतना दिसतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 15:58 IST

संबंधित बातम्या