हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन हे सतत नाविन्याच्या शोधात असतात आणि त्यांच्या याच स्वभावामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतानादेखील ते अघाडीवर असल्याचे दिसून येते. इंटरनेटसारख्या अधुनिक तंत्राचा मोठ्या खुबीने वापर करीत टि्वटर, फेसबुक आणि ब्लॉगसारख्या माध्यमातून ते सतत सक्रिय असल्याची प्रचिती येते. या नवमाध्यामातून सतत चाहत्यांच्या संपर्कात राहात ते आपल्या दैनंदिन कार्याची माहिती येथे पोस्ट करीत असतात. सोशल मीडियावरील त्यांच्या या सक्रियतेमुळे टि्वटरवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्या एक कोटी इतकी झाली आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावपर वापर करणारे अमिताभ बच्चन येथे आपली मते नोंदविण्याबरोबर चाहत्यांचे मनोरंजनदेखील करतात, त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटनांवर आपली मते नोंदवतात. अलिकडेच त्यांनी टि्वटरवर ‘बच्चनबोल’ (#BachchanBol) नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक बुधवारी ते चाहत्यांबरोबर काही मजेशीर आणि अनोख्या गोष्टी शेअर करतात. नुकतेच त्यांनी ‘शमिताभ’ या आगामी चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले.