देशात चोरीच्या घटना वाढत आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणे आता अभिनेते अभिनेत्रींनादेखील याचा सामना करावा लागला आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्रीला चोराने गंडा घातला ज्यात तिचे आणि तिच्या आईच्या काही वस्तू चोरल्या होत्या मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासात चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आम्रपाली दुबे ही भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतीच ती अयोध्येतील एका हॉटेलात थांबली होती. खोलीतून तिच्या वस्तू लंपास करण्यात आल्या. माध्यमांशी संवाद साधताना ती असं म्हणाली की “हे खूप भयानक आहे. माझ्या वस्तू हरवल्यावर मी तातडीने रिसेप्शनिस्टला कळवले, लगेच पोलीस आले त्यांनी सीसीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा लक्षात आले माझी चूक होती. मी दरवाज्याला लॉक करून आले नव्हते.”

दाक्षिणात्य अभिनेत्याने मानले कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आभार; म्हणाला, “सरकारने…”

पोलिसांनी जेव्हा सीसीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा कळले की तिच्या खोलीत एक तरुण शिरला त्याने तीन मोबाईल, काही दागिने त्याने लंपास केले. पोलिसांनी लगेच या चोराच्या मुसक्या आवळल्या असून पोलीस इतरांचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार चोरीला गेलेला ऐवज हा जवळपास २५ लाखांचा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्रपालीने उत्तर प्रदेश पोलिसांचे आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे आभार मानले असून ती असं म्हणाली “माझ्या सगळ्या गोष्टी मला परत मिळाल्या मला विश्वास बसत नाही हे २४ तासात मला परत मिळाले. मला खूप अभिमान आहे आणि मी गर्वाने सांगू शकते मी उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. “आम्रपालीने ‘रेहना है तेरी पालकों की छांओं में’ या शोमध्ये तिने सुमनच्या भूमिकेत दिसली होती. तिने झी टीव्हीवरील ‘सात फेरे’ आणि ‘मायका ‘या चित्रपटात काम केले. ‘मेरा नाम करेगी रोशन’मध्येही ही अभिनेत्री दिसली होती.