दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा ‘गहराइयां’ हा चित्रपट ११ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मॉर्डन रिलेशनशीप आणि ब्रेकअप दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात दीपिका आणि अनन्या पांडेने अनेक इंटिमेट सीन्स शूट केले आहेत. आता अनन्याने तिचे इंटिमेट सीन्स पाहून वडील चंकी पांडे आणि कुटुंबीयांची प्रतिक्रिया सांगितली आहे.

अनन्याने नुकतीच ई-टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने चित्रपटात इंटिमेट सीन्स पाहून प्रतिक्रिया कशी होती हे सांगितले आहे. ‘मी खूप उत्सुक आहे. माझ्याकडे जी कोणती स्क्रीप्ट येते ती माझी आई नेहमी वाचते. पण बाबा कधीही वाचत नाहीत. मी जेव्हा एखादा चित्रपट करण्याचा निर्णय घेते तेव्हा कधीही वडिलांना सांगत नाही. माझे कुटुंबीय मला नेहमी प्रोत्साहन देत असतात. ते काय विचार करतात याकडे माझे फार लक्ष असते.’

अनन्याने २०१९मध्ये ‘स्टूडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातून अनन्याने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली.