बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. एकीकडे रणबीर- आलियाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे विकी कौशल आणि कतरिना कैफदेशीर लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं वृत्त पसरू लागलंय. अशात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे बॉयफ्रेण्ड विक्की जैनसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त समोर आलंय.

गेल्या काही वर्षांपासून अंकिता विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलीय. यातच आता अंकिता आणि विक्की लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ईटाईम्सच्या वृत्तानुसार अंकिता आणि विक्कीने लग्नासाठी तारीख फायनल करण्यास सुरुवात केलीय. १२, १३ आणि १४ डिसेंबरला दोघं लग्नबंधनात अडकू शकतात. दोघांनी निकटवर्तीयांना निमंत्रण पत्रिका पाठवल्याचं देखील कळतंय.

…आणि भर पार्टीत अंकिताने सगळ्यांसमोरच बॉयफ्रेण्डला केलं किस, सोशल मीडियावर चर्चा

आर्यन खानच्या सुटकेनंतर सुहानाची पहिली पोस्ट, खास फोटो शेअर करत अनन्या पांडेला दिल्या शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंकिता आणि विक्की जवळपास साडे तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकताच अंकिता आणि विक्कीचा दिवाळी पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अंकिता आणि विक्की भर पार्टीत एकमेकांना किस करताना दिसून आले. विक्की जैनआधी अंकिता आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत रिलेशलशीपमध्ये होते. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं.