आजकाल अनेक बॉलिवूड कलाकार बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. या यादीमध्ये ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा देखील समावेश आहे. नुकतात अनुभव यांनी केलेल ट्विट चर्चेत आहे. त्यांनी ट्विटमध्ये देशातील अल्पसंख्यांकांसमोर गुडघे टेकून दाखवण्याचे चॅलेंज केले आहे.

अनुभव यांनी ट्विटमध्ये, ‘मी भारतीयांना चॅलेंज करतो की, एक तारीक ठरवा आणि देशातील अल्पसंख्यांकांच्या समोर गुडघे टेकून दाखवा. करु शकता? २ ऑक्टोबर रोजी? इतक्या वर्षांची माफी मागूया. ट्विटर आणि फेसबुकमधून बाहेर पडा’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

या पाठोपाठ त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. मी सर्वांना बोलत आहे. दलित, आदिवासी सगळेच असे त्यांनी म्हटले.

अनुभव सिन्हा नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्यांचे मत मांडत असतात. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘थप्पड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देखील चर्चेत होता.