scorecardresearch

Anupamaa मालिकेत नवा ट्विस्ट! परितोष बनणार अनुपमाचा शत्रू, स्वतःच्या आईलाच….

‘अनुपमा’मध्ये एकापाठोपाठ एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

Anupamaa मालिकेत नवा ट्विस्ट! परितोष बनणार अनुपमाचा शत्रू, स्वतःच्या आईलाच….
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

स्टार प्लस वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’मध्ये एकापाठोपाठ एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. परितोष म्हणजेच अनुपमाचा मुलगा तोषूने आधी आपल्या पत्नीची फसवणूक केली आणि आता तो त्याच्या आईचा शत्रू झाला आहे. तोषूला वाटतंय की अनुपमाच्या चुकीमुळे तो किंजलपासून वेगळा झालाय. अनुपमाच्या आगामी एपिसोडमध्ये परितोष त्याच्या आईला दोष देईल आणि बा देखील अनुपमाला बरं वाईट बोलेल, असं दाखवलं जाणार आहे.

आगामी एपिसोड्समध्ये दाखवण्यात येणार आहे की, बा, परितोष आणि किंजलच्या चिंतेत असणार आहेत. वनराज, पाखी आणि समर बा ला समजावतील. वनराज आणि समर तोषूला शोधण्यासाठी बाहेर पडतील, पण त्यांना तो सापडणार नाही. या सर्वांमुळे चिंतेत असलेली अनुपमा देखील शाह निवासवर पोहोचेल आणि बा तिला सर्व गोष्टींसाठी दोष देतील.

याच दरम्यान, तोषूदेखील नशेत घरी पोहोचेल आणि आपल्या मुलीला जवळ घेईल. पण नशेत असलेल्या तोषूच्या हातून मुलगी पडणार इतक्यात किंजल तिला वाचवेल. हे पाहून अनुजला राग येईल आणि तो तोषूला दूर ढकलून देईल. तोषू त्याच्या आईला वाईट बोलेल आणि चाकूने स्वतःला मारण्याची धमकी देईल. अनुपमा त्याला सांभाळेल आणि तोषू अनुपमाला बोलल्यानंतर तिथून निघून जाईल.

दुसरीकडे अनुजला बरखा आणि अंकुशने केलेल्या घोटाळ्याची माहिती मिळेल. त्याच्या गैरहजेरीत या दोघांनी ऑफिसमधील अनेक प्रकल्पात घोटाळा केल्याचे त्याला समजेल. तो अंकुशला त्याच्याबरोबर ऑफिसला जायला सांगेल आणि सर्व पाहून बरखा घाबरेल. पुढच्या एपिसोडमध्ये तोषू आपल्या आईचे आयुष्य वेगवेगळ्या प्रकारे खराब करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तुम्हाला दिसेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या