“भावा तू तर नजरेनेच एखाद्याला घायाळ करशील”; अनुराग कश्यपने घेतली फिरकी

मोदींवर केली टीका रिप्लायमध्ये आला ऑडिशनचा व्हिडीओ

चित्रपट हा जगातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटात काम करण्याची एक संधी मिळावी यासाठी जगभरातील लोक सातत्याने प्रयत्न करत असतात. संधी मिळेल तिथे आपलं टॅलेंट दाखवतात. अगदी युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिक-टॉक अशा जवळपास सर्वच सोशल मीडिया साईटवर असे अभिनय वेडे लोक दिसतात. असेच एक ऑडिनश दिग्दर्शक अनुराग कश्यपसाठी एका तरुणाने दिले आहे.

अनुरागने नरेंद्र मोदींनी केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेवर टीका करण्यासाठी एक ट्विट केले होते. या ट्विटवर रिप्लाय म्हणून एका तरुणाने एक ऑडिशन व्हिडीओ पोस्ट केला आहे. या तरुणाला चित्रपटात खलनायकाची भूमिका हवी आहे. “सर अॅक्टिंग माझं पॅशन आहे. हा माझा ऑडिशन व्हिडीओ आहे. कृपया चित्रपटात काम करण्याची एक संधी मला द्या. असे म्हणत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनुरागने देखील “भावा तू तर डोळ्यांनीच एखाद्याला घायाळ करशील” असं म्हणत त्याला गंमतीशीर रिप्लाय दिला आहे.

ऑडिशन देणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याच्यावर काही गंमतीशीर कॉमेंट देखील केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anurag kashyap is impressed with a funny clip shared by a fan mppg

ताज्या बातम्या