‘रिव्हॉल्वर दादीं’ना न्याय देऊ शकेल का ही अभिनेत्री?

वयाची पन्नाशी उलटल्यानंतर रिव्हॉल्वर दादीने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.

chandro tomar
चंद्रो तोमर

खऱ्या आयुष्यातील प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर आणल्या जात आहेत आणि प्रेक्षकांचा अशा चित्रपटांना चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. मग ते ‘भाग मिल्खा भाग’ असो किंवा ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’. बायोपिकचा ट्रेण्डच सध्या बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे. अशाच आणखी एक प्रेरणादायी कथा दिग्दर्शक अनुराग कश्यप घेऊन येत आहे. जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून ‘वुमनिया’ असं त्याचं नाव आहे.

उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांचा जीवनपट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘पिंक’ फेम अभिनेत्री तापसी पन्नूची यामध्ये मध्यवर्ती भूमिका असून या वर्षाअखेरील शूटिंगला सुरुवात होणार आहे.
वयाच्या ५० वर्षांनंतरही आयुष्याची एक नवी सुरुवात करता येऊ शकते हे चंद्रो आणि प्रकाशी यांच्याकडे पाहून समजते. ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून यांना ओळखलं जातं. जोहरी रायफल क्लबमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध स्पर्धांमध्ये या दोघींनी मिळून १००हून अधिक पदकं जिंकली आहेत. प्रकाशी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते श्री शक्ती पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे. चंद्रो आणि प्रकाशी यांची मुलं आणि नातवंडंसुद्धा शूटर्स आहेत. तोमर कुटुंबातील महिला जोहरी रायफल असोसिएशनमध्ये प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

वाचा : जान्हवी- इशानने असा शूट केला ‘धडक’मधील इंटिमेट सीन

तापसीने या चित्रपटासाठी होकार दिला असून इतर कलाकारांची निवड सध्या सुरू आहे. आता तापसी या भूमिकेला न्याय देऊ शकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anurag kashyap mentors biopic on revolver daadis worlds oldest sharp shooters chandro and prakashi tomar

ताज्या बातम्या