अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. २००८ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अनुष्का शर्माने पडद्यावर विविध मनोरंजक भूमिका साकारल्या आहेत. तिची कारकीर्द जितकी यशस्वी झाली आहे, तितकीच तिची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथाही सुंदर आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे क्रिकेट आणि बॉलीवूडमधील दोन चमकणारे तारे आहेत.
शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झालेली भेट प्रेमात कशी बदलली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की, विराट कोहलीशी लग्न करताना अनुष्का शर्माने त्याचे नाव बदलले होते? यामागील कारण काय होते, अनुष्काला का बदलावे लागले विराट कोहलीचे नाव आणि शाहरुख खानशी त्याचे काय नाते आहे, अभिनेत्रीच्या वाढदिवशी जाणून घेऊ तिच्या लग्नाशी संबंधित ही रंजक कहाणी.
अनुष्का शर्माने विराट कोहलीला हे नाव दिले होते
१ मे १९८८ रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जन्मलेली अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती स्वतःला वादांपासून दूर ठेवते. लग्नापूर्वी अनुष्काने विराट कोहलीला बराच काळ डेट केले होते; पण तिने ते पूर्णपणे सीक्रेट ठेवले. बरं, फक्त डेटिंगच नाही, तर अनुष्का शर्माने तिचे लग्नदेखील सीक्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला.
२०१७ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये गुप्तपणे लग्न केले. त्यांच्या लग्नात इतके मर्यादित लोक उपस्थित होते की, विशेष कोणाला त्या लग्नाचा थांगपत्ताही लागला नाही. या काळात अनुष्काने विराटचे नावही बदलले, ज्याबद्दल स्वतः अभिनेत्रीने सांगितले होते. अभिनेत्रीने ‘वोग’ या मासिकाला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सांगितले, “आम्हाला आमचे लग्न इतके सीक्रेट ठेवायचे होते की, जेव्हा मी केटररशी बोलत होते तेव्हा आम्ही त्यांना आमची नावेही खोटी दिली होती. आम्ही विराटचे नाव ‘राहुल’ असल्याचे सांगितले.”
शाहरुख खानचे विराटच्या नावाशी असलेले नाते
शाहरुख खान हा अनुष्का शर्माचा पहिला को-स्टार आहे. ऑनस्क्रीन किंग खानने सर्वाधिक चित्रपटांमध्ये ‘राहुल’ ही भूमिका साकारली आहे. सध्या अनुष्का शर्मा इंडस्ट्रीपासून दूर तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करीत आहे. २०२१ मध्ये तिने तिची मुलगी वामिकाचे स्वागत केले आणि तीन वर्षांनंतर तिने मुलगा अकायला जन्म दिला, ज्याबद्दलची माहिती अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलाचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यानंतर सतत बातम्या येत होत्या की, हे जोडपे लवकरच भारत सोडून परदेशात जाऊ शकते. परंतु, दोघांपैकी कोणीही अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.