बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही करत आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा गल्ला करणारा सिनेमा ठरेल. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुकही केले जात आहे. तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच वाढ झाली असेल यात काही शंका नाही. तिचा हा सिनेमा पाहून झाल्यावर तिच्या एका चाहत्याने ट्विटरवर तिला एक प्रश्न विचारला. त्याचा हा प्रश्न वाचून तिचा राग अनावर झाला आणि तिने त्याला रागात चांगले सुनावलेही.
त्याचं झालं असं की, तिच्या एका चाहत्याने तिच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, ‘अनुष्का मी माझ्या किडनीवर तुझे नाव लिहिले आहे.’ त्याचा हा मेसेज पाहून अनुष्काचा राग अनावर झाला. तिने त्याला उत्तर देताना म्हटले की, ‘कृपा करुन अर्थहीन बोलणं बंद करा.’
ऐ दिल है मुश्किल सिनेमात अनुष्कासोबत रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चनही आहेत. रणबीर आणि अनुष्का यांच्या केमिस्ट्रीचीही जोरदार चर्चा होती. करण जोहरच्या ‘ऐ दिल है..’ या सिनेमासोबत अजय देवगणचा ‘शिवाय’ हा सिनेमाही प्रदर्शित झाला होता.