बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. अनुष्का ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच अनुष्का शर्मा ही पती विराट कोहलीसोबत एका रुग्णालयाबाहेर दिसली होती. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनुष्का आणि विराट एकत्र रुग्णालयातून बाहेर पडताना दिसल्यानंतर ती पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नुकतंच ते दोघे रुग्णालयात का गेले होते? याचा खुलासा झाला आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे काही दिवसांपूर्वी मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. सुट्ट्यांवरुन परतल्यानंतर ते दोघेही मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाबाहेर पडताना दिसले होते. विराट आणि अनुष्का रुग्णालयात जात असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक युजर्सने अनुष्का प्रेग्नंट असल्याची कमेंट केली होती. त्यामुळे विराट अनुष्काबद्दल विविध चर्चा रंगल्या होत्या. पण या सर्व चर्चा खोट्या असल्याचे समोर आले आहे.

“माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा ही मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात फिजियोथेरेपिस्टकडे गेली होती. ती लवकरच चकदा एक्सप्रेस या चित्रपटाद्वारे पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामी हिच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित आहे. या चित्रपटात ती झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटासाठी अनुष्काही फार मेहनत घेत आहे. यात ती एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार असून सध्या ती गोलंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे. याच कारणामुळे अनुष्का शर्मा फिजिओथेरपिस्टकडे तपासणीसाठी गेली होती. यावेळी तिच्या काही तपासण्याही करण्यात आल्या.

जिनिलियाने शेअर केला विलासराव देशमुखांसोबतचा आवडता फोटो, कॅप्शन चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनुष्का ही २०१८ मध्ये आनंद एल राय दिग्दर्शित झिरो चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट साईन केला नव्हता ती तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करत होती. पण गरोदरपणा आणि मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने यातून ब्रेक घेतला. यानंतर तब्बल ४ वर्षांनी अनुष्का ही चकदा एक्सप्रेस चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.