scorecardresearch

Premium

“कोहली आज तो रन बना लै…” भर कार्यक्रमात अनुष्का शर्माने नवऱ्याची उडवली खिल्ली; उत्तर देत विराट म्हणाला…

भर कार्यक्रमात विराट कोहलीची खिल्ली उडवत अनुष्का शर्मा म्हणाली…

anushka sharma and virat kohli video viral
भर कार्यक्रमात विराट कोहलीची खिल्ली उडवत अनुष्का शर्मा म्हणाली… ( फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम चर्चेत असतात. अलीकडेच दोघांनी ‘प्युमा’ (Puma) या स्पोर्ट्स ब्रॅण्डच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान मुलाखतकाराने या जोडीला भन्नाट प्रश्न विचारले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या कमाईत घसरण; २५ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

Avdhoot
‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पृहा जोशीच्या ऐवजी दिसणार रसिका सुनील, प्रतिक्रिया देत निर्माता अवधूत गुप्ते म्हणाला, “मी तिला…”
Kokanhearted Girl Ankita Walawalkar Revels Crush not Onkar Bhojane But On Married Actor Says He Showed Bad Attitude
Video: कोकणहार्टेड गर्लने त्या ‘क्रश’ला केलं अनफॉलो! म्हणाली, “मला त्याने एका कार्यक्रमात खूप…”
Abdul_Bari
राजद पक्षाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांच्या महिला आरक्षणावरील विधानामुळे नवा वाद; भाजपाची टीका
Senior Marathi Actor Rajan Patil questions about ruckus in Gautami Patil every program
गौतमी पाटील आयकर भरते का? उत्पन्नात वाटेकरी कोण? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे ७ प्रश्न; म्हणाले “प्रत्येक कार्यक्रमात राडा…”

अनुष्का-विराटला या कार्यक्रमात विविध टास्क देण्यात आले होते आणि दोघांच्या ‘प्युमा’ कर्मचाऱ्यांबरोबर दोन वेगवेगळ्या टीम बनवण्यात आल्या होत्या. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माला विराट कोहलीला स्लेज करण्यास सांगितले होते. टास्कप्रमाणे नवऱ्याला स्लेज करण्यासाठी अनुष्का शर्मा विकेटकीपर झाली आणि कोहली फलंदाजी करीत होता. या वेळी, “चल विराट, आज २४ एप्रिल आहे… आज तो रन बना लै कोहली…” असे म्हणत अनुष्काने भर कार्यक्रमात विराटची खिल्ली उडवली. याला उत्तर देताना विराट म्हणाला, तुझ्या सगळ्या टीमने एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये मिळून जेवढ्या धावा केल्या नसतील तेवढ्या माझ्या मॅच आहेत. नवऱ्याचे हे उत्तर ऐकून अनुष्का म्हणाली, “हो आतापासून मी तुझ्या टीममध्ये…” या वेळी दोघांच्या रिअल लाइफ केमिस्ट्रीचे उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.

हेही वाचा : सौरव गांगुलीच्या बायोपिकची चर्चा; आता रणबीर कपूरऐवजी ‘या’ अभिनेत्याची लागू शकते वर्णी!

अनुष्का शर्माला या कार्यक्रमादरम्यान तुझ्या जीवनात कशामुळे बदल झाला आणि तू तुझ्या चाहत्यांना कोणता सल्ला देशील, असा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न ऐकून अनुष्का शर्मा सर्वात आधी हसली आणि म्हणाली, “माझ्या आयुष्यात दोन गोष्टींमुळे प्रचंड बदल झाला. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण, मी कायम रात्री लवकर झोपते आणि रात्रीचे जेवण संध्याकाळी जेवते. मी रात्रीचे नऊ – साडेनऊ वाजले की झोपते…” यावर उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा : सलमान की शाहरुख कोणाला निवडशील? आमिर खान उत्तर देत म्हणाला, “भाई तो कभी डूबेंगे नही…”; ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

अनुष्का-विराटच्या या मुलाखतीमधील अनेक लहान-लहान व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, विराट सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना झाला असून अनुष्काने अलीकडेच ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर पदार्पण केले. लेक वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने बॉलीवूडमधून काही काळ ब्रेक घेतला असून, लवकरच ती ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anushka sharma sledge virat kohli in event for not scoring runs video goes viral sva 00

First published on: 31-05-2023 at 12:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×