टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. असंख्य क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत म्हणून त्याला ओळखले जाते. एम.एस. धोनीचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वजणच उत्सुक असतात. नुकतंच यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामातील एम.एस धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. यात प्रसिद्ध गायक अरिजित सिंह हा एम. एस. धोनीच्या पाया पडताना दिसत आहे.

शुक्रवारी ३१ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामाला सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएल हंगामाचा उद्धाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. एम एस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्स यांच्यात पहिला सामना रंगला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला.
आणखी वाचा : Video: चिखल, जीवघेणी गर्दी अन्…; अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टनंतर संतापलेले चाहते म्हणाले, “हजारोंची तिकीटं…”

या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आयपीएलच्या उद्धाटनासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावल्याचे. यावेळी अरिजित सिंहने त्याच्या गाण्याचा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर एम.एस. धोनी हा मंचावर पोहोचला. त्याने तिथे उपस्थित असलेल्या तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना या दोघींना हात मिळवले.

त्यानंतर धोनी हा अरिजित सिंहकडे आला, तेव्हा त्याने खाली वाकून धोनीच्या पायाला स्पर्श केला. यावेळी धोनीने त्याचा हात पकडला आणि त्याला घट्ट मिठी मारली. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “बेबी ऑन बोर्ड”! लग्नानंतर ६ वर्षांनी प्रसिद्ध सेलिब्रेटी जोडप्याने दिली गुडन्यूज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओखाली असंख्य चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळत आहे. एक अनोखा आणि अद्भुत क्षण, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एकाने म्हणूनच मला हे दोन व्यक्ती आवडतात. ते किती साधे, कूल आणि अजिबात गर्व नसलेले आहेत, अशी कमेंट एकाने केली आहे.