‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारणार आहे. शिवकर तळपदे हे महाराष्ट्रातील असे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी युरोपातील राईट बंधूंच्याही आधी स्वयंचलित विमानाचा शोध लावला असल्याचे मानले जाते. या चित्रपटातील तळपदेंची भूमिका साकारण्यासाठी आयुषमान सध्या मराठीचे धडे घेत आहे.
आयुषमान खुराना आपल्या भूमिकेबद्दल म्हणाला, “मला अशा प्रकारच्या सिनेमात काम करायला खूप आवडते. मला अशाच प्रकारचे चरित्र साकारण्याची इच्छा होती. करिअरच्या सुरूवातीलाच मला अशी भूमिका साकारायला मिळते, याचा मला अभिमान वाटत आहे. माझ्या सिनेमाचे स्क्रीन रायटर मराठी असल्यामुळे मराठी भाषेसंदर्भात ते मला मार्गदर्शन करत आहेत.”
सध्या आयुषमान खुराना यशराज फिल्म्सच्या ‘बेवकुफियाँ’ या सिनेमात काम करत आहे. त्यानंतर तळपदेंवरील चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2013 रोजी प्रकाशित
आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे
‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारणार आहे.

First published on: 08-10-2013 at 10:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana to play scientist shivkar talpade in his next