गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट, कतरिना कैफ-विकी कौशल यांच्यानंतर आता लवकरच अभिनेता प्रभासही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलल जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास हा कधी लग्न करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतंच प्रभासने एका मुलाखतीत त्याच्या लग्नाच्या चर्चांवर उत्तर दिले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट हँडसम बॅचरल कोण? असा प्रश्न विचारला तर सहाजिकच अभिनेता प्रभासचं नाव प्रथम घेतलं जाते. बाहुबली या चित्रपटानंतर प्रभासची लोकप्रियता तुफान वाढली आहे. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायमच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाची चर्चा रंगत असते. अनेकदा त्याचं नाव अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबतदेखील जोडलं जातं. प्रभास हा लवकरच ‘आदिपुरुष’ या चित्रपटात झळकणार असून तो सध्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

“जेव्हा मी माझ्या मुलांना दूध पाजले तेव्हा…”, स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नुकतंच एका मुलाखतीत प्रभासला ‘तू लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रभास म्हणाला, “गेल्या अनेक दिवसांपासून मला लोक लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारतात. पण मला माहिती आहे की ते माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांना आयुष्यात माझे चांगले व्हावे, असे वाटते.”

“पण ही एक सामान्य आणि नैसर्गिक गोष्ट आहे. जर मी त्यांच्या जागी असतो, तर मी देखील असेच प्रश्न विचारले असते. जेव्हा माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असेल, तेव्हा मी निश्चितपणे याबाबत सांगेन”, असेही तो म्हणाला.

प्रभासचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. अनुष्का शेट्टीसोबत त्याचे नाव प्रचंड चर्चेत असते. त्यांचे चांगले मित्र आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

“मी काय बोलू…”, ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने अमृता खानविलकरसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार यांची निर्मिती करत आहेत.