दिग्दर्शक ओम राऊतचा बिगबजेट ‘आदिपुरुष’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. सध्या हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होत आहे. चित्रपटाच्या सेटवर दोघांनी एकत्र वेळ घालवला होता तसेच चित्रीकरणानंतरदेखील हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघांच्या नात्याबद्दल फक्त चर्चा आहे ठोस माहिती मिळालेली नाही. क्रितीच्या आधी प्रभासचं दक्षिणेतील

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आता बॉलिवूडमध्येदेखील प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले होते. याच चित्रपटात त्याची नायिका होती अनुष्का शेट्टी. चित्रपट प्रदर्शित झाल्यांनतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. तेव्हा प्रभासने एका मुलाखतीत सांगितले होते की ‘मी आणि अनुष्का एकमेकांना ९ वर्षांपासून ओळखत आहोत. आम्ही चांगले मित्र आहोत’. डेटिंगच्या प्रश्नावर प्रभासने मोकळपणाने म्हणाला होता की, ‘आमच्यात प्रेम वगरे असे काहीच नाही, आम्ही एकत्र बऱ्याच चित्रपटात काम केले आहे त्यामुळे साहजिकच लोकांना वाटू शकते आमच्यात प्रेम आहे, अशा अफवा पसरत असतात’.

दाक्षिणात्य स्टार प्रभास आणि क्रिती करतायत एकमेकांना डेट, चर्चांना उधाण

बाहुबलीनंतर ‘साहो’ आणि ‘राधे श्यामसारख्या’ बिग बजेट चित्रपटात प्रभास आपल्याला दिसला, पण बाहुबलीसारखं यश या चित्रपटांना लाभलं नाही. आदिपुरुषच्या बरोबरीने त्याचा आणखीन एक चित्रपट येणार आहे तो चित्रपट म्हणजे ‘सालार’ नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. एकंदर सालारच्या पोस्टरवरून आणि प्रभासच्या लूकवरून हा एक अॅक्शनपट असल्याचं स्पष्ट होत आहे. दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासनदेखील या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांच्या मते हा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

View this post on Instagram

A post shared by AnushkaShetty (@anushkashettyofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘आदिपुरुष’ चित्रपट रामायण या महाकाव्यावर बेतलेला आहे असं या चित्रपटाच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे. पूर्णपणे रामायण यात नसलं तरी त्यासदृश्य कथा आपल्याला यामध्ये बघायला मिळेल. या चित्रपटात क्रिती सॅनॉन ही जानकी भूमिकेत दिसणार आहे तर प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच सैफ अली खान हा पुन्हा लंकेश या आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.