बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. एकीकडे इनस्टाग्रामवर वेगवेगळे फोटो पोस्ट करत त्यांच्या कामा बद्दल लोकांना अपडेट देत असतात तर दुसरीकडे ट्विटरवर बेधडक पणे त्यांचे विचार मांडताना दिसतात. अमिताभ यांनी नुकताच एक फोटो शेअर केला असून त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काल २९ ऑगस्ट रोजी नॅशनल स्पोर्ट्स दिवस साजरा केला जातो . हा खास दिवस बिग बी यांनी एका अनोख्या अंदाजात साजरा केला. त्यांनी इनस्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला होता ज्यात अमिताभ बच्चन फुटबॉलशी खेळत आहेत. तर जया बच्चन, छोटा अभिषेक आणि श्वेता बच्चन ते बघत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी “नॅशनल स्पोर्ट्स डे” असं कॅप्शन दिलं होतं. त्यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अमिताभ खूप तरुण असल्याचे दिसून येत आहे.

अमिताभ बच्चन सोबतच त्यांच्या मुलाने देखील राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त एक व्हिडीओ त्याच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिषेक फुटबॉल खेळताना दिसून आला आहे. या व्हिडीओसह त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी ठरलेल्या सर्व खिलाडूंना शुभेच्छा  दिल्या आहेत. अलीकडेच अभिषेक ‘बिग बुल’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतान दिसला होता. या चित्रपटात त्याने स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताची भूमिका केली होती. यातील भूमिकेसाठी त्याचे कौतुक होतं आहे. तो सध्या ‘बॉब बिस्वास’ आणि ब्रीद या वेब सीरिजसाठी तयारी करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अमिताभ बच्चन देखील अनेक चित्रपटांवर काम करत असून नुकतीच त्यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच ते ‘झुंड’, ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतील. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात अभिताभ यांच्या बरोबर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याचबरोबर अमिताभ हे केबीसी १३ गेम शो होस्ट करत असून प्रेक्षकांना हा शो खूप आवडत आहे.