पहिल्या एपिसोडपासूनच ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन चांगलाच चर्चेत आला आहे. पहिल्या भागातच मीरा आणि स्नेहा वाघमध्ये जेवणावरून वाद पेटला तर वेगवेगळ्या टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. रंगतदार आठवड्यानंतर विकेण्डला ‘बिग बॉस मराठी ३’च्या पहिल्याच चावडीवर मात्र महेश मांजरेकरांनी अनेक स्पर्धकांची शाळा घेतली.
‘बिग बॉस मराठी ३’च्या चावडीवर महेश मांजरेकरांनी मीरा जगन्नाथची शाळा घेत तिला चांगलचं सुनावलं. पहिल्या दिवसापासूनच मीराने घरात भांडण करण्यास सुरुवात केली असून मीरा अनेक ठिकाणी चुकल्याचं महेश मांजरेकर म्हणाले. यावेळी स्पष्टीकरण देण्यासाठी मीराने प्रयत्न केला मात्र संतापलेल्या महेश मांजरेकरांनी तिला “तू आधी ऐकायला शिक” म्हणत मीराची बोलती बंद केली.
बिग बॉस मराठी ३: गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?
तर मीरासोबत प्रत्येक डावपेचात सोबतच असणाऱ्या गायत्री दातारला देखील महेश मांजरेकरांनी धारेवर धरलं. गायत्री स्वत:चा खेळ खेळत नसून मीराच्या मागे ती कोकरासारखी फिरत असल्याचं म्हणत मांजरेकरांनी गायत्रीची देखील शाळा घेतली.
मोनोकनीमधील परिणीती चोप्राचा ‘जलपरी’ अंदाज व्हायरल, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
सर्वात वाईट शेफने बनवलेला पदार्थ खाण्याच्या टास्कमध्ये दादूसने उत्तम खेळ खेळत घरातील स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आणलं होतं. ‘बिग बॉस मराठी ३’च्या चावडीवर महेश मांजरेकरांनी या टास्कसाठी दादूस यांचं कौतुक केलं. तर या टास्कमध्ये दादूसला पाठिंबा न देता इतरांनादेखील दादूस विरोधात करणाऱ्या मीरावर मांजरेकर चांगलेच भडकले. “मी दोन दिवसात घरात येतो आणि सेम रेसिपी करून तुला खाऊ घालतो, खाशील का?” असं म्हणत ते मीरासह दादूसला सपोर्ट न करणाऱ्या स्पर्धकांवर ते भडकले.
या चावडीवर महेश मांजरेकर यांनी उत्कर्षलादेखील डबल ढोलकी म्हणत सुनावलं. तर विशालच्या विरोधात गट तयार करणाऱ्या जयची पोलखोल केली.