शाहरुख आणि गौरी खान बॉलिवूडमधील आदर्श असे जोडपे. शाहरुख खान स्टार होण्याआधीच दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांची प्रेमकहाणी देखील चित्रपटातील कथेप्रमाणे आहे. दोघांचे प्रेम जरी दिल्लीत जमले असले तरी त्यांचा संसार मात्र मुंबईत झाला. हिरो बनण्याचा स्वप्न घेऊन आलेल्या शाहरुखने अल्पवधीतच बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले. गौरी खानने देखील त्याला कायमच पाठिंबा दिला आहे. शाहरुखच्या यशात तिचा देखील वाटा आहे.

करोनाकाळात देखील गौरी शाहरुखच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती. ‘फॅब्युलंस लाइव्ह्स विथ बॉलिवूड’ वाईफ्स या कार्य्रक्रमात करण जोहरने खुलासा केला की करोना काळात शाहरुखच्या घरात कमावणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे ‘गौरी खान’. करण पुढे म्हणाला की, ‘खुद्द शाहरुखने मला हे हसत हसत सांगितले आहे. शाहरुखचा चार्टड अकाउंटंट देखील शाहरुखला म्हणाला की तू तुझ्या पत्नीकडून काहीतरी शिक, गौरीच एकमेव घरातील व्यक्ती आहे जी नफ्यात आहे’.

“तुमच्याकडे कथा नसेल तर… ” लाल सिंग चड्ढा चित्रपटावर दिग्दर्शक प्रकाश झा यांची टीका

‘फॅब्युलंस लाइव्ह्स विथ बॉलिवूड वाईफ्स’ या कार्यक्रमात करण जोहर आणि गौरी खान पाहुणे कलाकार म्हणून दिसले होते. दुसऱ्या सीझनमध्ये संजय कपूरची पत्नी महीप, चंकी पांडेची पत्नी भावना, सोहेल खानची माजी पत्नी सीमा सजदेह आणि समीर सोनीची पत्नी, अभिनेत्री नीलम कोठारी हे कलाकार पुन्हा एकदा दिसणार आहेत. या सीझनमध्ये अर्जुन कपूर, बादशाह, मलायका अरोरा, बॉबी देओल, जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार पाहुणे म्हणून दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरी खानचा इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय आहे. तिने करण जोहरची टेरेस तसेच यश आणि रुहीची नर्सरी डिझाइन केली आहे. तिने रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जॅकलीन फर्नांडिस या लोकप्रिय कलाकारांच्या घराचे इंटिरियर्स केले आहे. तसेच ती निर्मिती क्षेत्रात देखील कार्यरत आहे.